Home /News /sport /

IND vs ENG : अक्षर पटेलच्या फिरकीने गुंडाळली इंग्लंडची बॅटिंग

IND vs ENG : अक्षर पटेलच्या फिरकीने गुंडाळली इंग्लंडची बॅटिंग

अक्षर पटेल (Axar Patel) आणि अश्विन (R.Ashwin) च्या फिरकीने तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगची (India vs England) दाणादाण उडाली आहे.

    अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अक्षर पटेल (Axar Patel) आणि अश्विन (R.Ashwin) च्या फिरकीने तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगची (India vs England) दाणादाण उडाली आहे. अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा फक्त 112 रनवर ऑल आऊट झाला आहे. भारताकडून अक्षर पटेलने 6, अश्विनने 3 तर आपली 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्माने एक विकेट घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलेने सर्वाधिक 53 रनची खेळी केली. या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण इशांत शर्माने सुरूवातीलाच इंग्लंडला पहिला धक्का दिला. ओपनर डॉमनिक सिबले शून्य रनवर माघारी परतला, यानंतर मात्र अक्षर आणि अश्विनने इंग्लंडला सावरूच दिलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने ही टेस्ट दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. या मॅचसाठी भारताने टीममध्ये दोन तर इंग्लंडने चार बदल केले. दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) या मॅचमध्ये पुनरागमन झालं आहे. विशेष म्हणजे बुमराहचं हे होम ग्राऊंड आहे. मोहम्मद सिराजच्या जागी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. तसंच वॉशिंग्टन सुंदरचा कुलदीप यादवच्या जागेवर समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडच्या टीममध्ये देखील चार बदल करण्यात आले आहेत. जॉनी बेअरस्टो, जेम्स एंडरसन, जोफ्रा आर्चर आणि झॅक क्राऊलीचा इंग्लंडच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या टेस्टसाठी भारताची टीम - विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा तिसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम - जो रुट, डॉम सिबले, झॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या