अहमदाबाद, 16 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये (India vs England) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉसवेळी पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का दिला. दोन मॅच विश्रांती घेतल्यानंतर रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं, पण रोहितच्या जागी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) बाहेर बसवण्यात आलं आहे. टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) या मॅचमध्येही शून्य रनवर आऊट झाला. सीरिजच्या तिन्ही मॅचमध्ये राहुलला खातं उघडण्यात आलं नाही.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मधून सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण त्या मॅचमध्ये सूर्यकुमारला बॅटिंगची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या मागच्या तिन्ही मोसमात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमार यादवची भारतीय टीममध्ये अखेर निवड झाली.
आयपीएलच्या मागच्या तीन मोसमात सूर्याने 480, 424 आणि 512 रन केले. मुंबई इंडियन्सना लागोपाठ दोनवेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात सूर्यकुमार यादवने मोलाची भूमिका बजावली.
केएल राहुलने 47 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 40.61 च्या सरासरीने आणि 143.14 च्या स्ट्राईक रेटने 1,078 रन केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. सीरिजच्या सुरूवातीलाच कर्णधार विराट कोहली याने केएल राहुल आणि रोहित शर्मा हे आमचे ओपनर असतील, तसंच शिखर धवन तिसरा ओपनर म्हणून पर्याय असेल, असं स्पष्ट केलं होतं. रोहित शर्माला विश्रांती दिली तेव्हा पहिल्या मॅचमध्ये शिखर धवन आणि केएल राहुल, तर दुसऱ्या मॅचमध्ये इशान किशन आणि केएल राहुल ओपनिंगला खेळले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Kl rahul, Rohit sharma, Virat kohli