मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG 3rd T20 : बटलरने कुटलं! टीम इंडियाला पराभवाचा धक्का

IND vs ENG 3rd T20 : बटलरने कुटलं! टीम इंडियाला पराभवाचा धक्का

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs England) 8 विकेटने पराभव केला आहे. भारताच्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला. जॉस बटलरने (Jos Butller) 52 बॉलमध्ये नाबाद 83 रन केले, त्याने 5 फोर आणि 4 सिक्स लगावले.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 16 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा (India vs England) 8 विकेटने पराभव केला आहे. भारताच्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 18.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला. जॉस बटलरने (Jos Butller) 52 बॉलमध्ये नाबाद 83 रन केले, त्याने 5 फोर आणि 4 सिक्स लगावले. तर जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 28 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. जेसन रॉय 9 रनवर आणि डेव्हिड मलान 18 रनवर आऊट झाले. युझवेंद्र चहलला आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी भारताची बॅटिंग पुन्हा अपयशी ठरली. विराट कोहली वगळता इतर कोणत्याही भारतीय बॅट्समनना मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. 46 बॉलमध्ये 77 रनवर विराट नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर ऋषभ पंतने 20 बॉलमध्ये 25, हार्दिक पांड्याने 15 बॉलमध्ये 17 रन केले. ओपनर केएल राहुल लागोपाठ दुसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला. भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 156 रन केले. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आणि क्रिस जॉर्डना 2 विकेट घेण्यात यश आलं.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने (India vs England) बदल केले. दोन टी-20 मॅचच्या विश्रांतीनंतर रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये आगमन झालं. पदार्पणाच्या मॅचमध्ये बॅटिंग न मिळालेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला बाहेर बसावं लागलं आहे. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.

5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच इंग्लंडने तर दुसरी मॅच भारताने आणि तिसरी पुन्हा इंग्लंडने जिंकली, त्यामुळे सीरिजमध्ये इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. या तिन्ही मॅचमध्ये टॉस जिंकणाऱ्या टीमला मॅचमध्ये विजय मिळाला, त्यामुळे तिन्ही मॅचमध्ये टॉसने मोलाची भूमिका बजावली. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T-20 World Cup) दृष्टीने ही सीरिज अत्यंत महत्त्वाची आहे. वर्ल्ड कपसाठी टीम संतुलित व्हावी, यासाठी टीममध्ये अनेक युवा खेळाडूंना खेळवण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Rohit sharma, T20 cricket, Virat kohli