• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : हार्दिकने सोडला स्टोक्सचा सोपा कॅच, विराट-रोहित वैतागले

IND vs ENG : हार्दिकने सोडला स्टोक्सचा सोपा कॅच, विराट-रोहित वैतागले

भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन्ही टीमसाठी तिसरी वनडे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तीन वनडे मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बेन स्टोक्सचा (Ben Stokes) सोपा कॅच पकडला.

 • Share this:
  पुणे, 28 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन्ही टीमसाठी तिसरी वनडे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तीन वनडे मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बेन स्टोक्सचा (Ben Stokes) सोपा कॅच पकडला. यानंतर दुसऱ्या वनडेमध्ये 99 रनची आक्रमक खेळी करणारा स्टोक्स भारतासाठी धोकादायक ठरेल, असं वाटत होतं, पण असं झालं नाही. इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर स्टोक्सेने स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण बॉल हवेत गेला. 30 यार्डावर उभ्या असलेल्या हार्दिक पांड्याला हा कॅच पकडता आला नाही, त्यावेळी स्टोक्स 15 रनवर खेळत होता. हार्दिकने कॅच सोडल्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संपूर्ण टीमने डोक्यावर हात ठेवला. हार्दिकसारखा उत्कृष्ट फिल्डर एवढा सोपा कॅच सोडू शकतो, यावर टीममधल्या कोणाचाच विश्वास बसला नाही. बेन स्टोक्सच्या आधी भुवनेश्वर कुमारने इंग्लंडचा ओपनर जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉयला आऊट केलं होतं, त्यामुळे भारताला स्टोक्सची विकेट मिळाली असती तर भारताची या मॅचवरची पकड आणखी मजबूत झाली असती. स्टोक्सला या मॅचमध्ये मोठी खेळी करता आली नाही. 35 रन करून तो आऊट झाला, सीरिजमधली पहिलीच मॅच खेळण्याऱ्या नटराजनने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. याआधी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने तर टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता.
  Published by:Shreyas
  First published: