• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : पुजाराची जागा घेऊ शकतात हे 3 खेळाडू, तिसऱ्या क्रमांकाला देतील मजबुती!

IND vs ENG : पुजाराची जागा घेऊ शकतात हे 3 खेळाडू, तिसऱ्या क्रमांकाला देतील मजबुती!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का लागला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) बदलाचे संकेत देत चेतेश्वर पुजारावर (Cheteshwar Pujara) अप्रत्यक्ष निशाणा साधला.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का लागला. यानंतर आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानात हरवणं सगळ्यात कठीण आहे, त्यामुळे टीमला त्यांची कमजोरी दूर करावी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) बदलाचे संकेत देत चेतेश्वर पुजारावर (Cheteshwar Pujara) अप्रत्यक्ष निशाणा साधला. एकेकाळची टीम इंडियाची भिंत असलेला पुजारा आता टीमसाठी कमजोरी बनत आहे. फायनलमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याचं स्थान आता धोक्यात आलं आहे. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 18 मॅच खेळल्या, यात त्याला 28.03 च्या सरासरीने 841 रन करता आल्या, यात त्याला एकही शतक करता आलं नाही आणि त्याने 9 अर्धशतकं केली. या कामगिरीनंतर पुजाराची जागा घेण्यासाठी 3 खेळाडू तयार आहेत. हनुमा विहारी पुजाराचा पर्याय? हनुमा विहारीला (Hanuma Vihari) भारताचा टेस्ट स्पेशलिस्ट बॅट्समन मानलं जातं. विहारीमध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. विहारीने आतापर्यंत 12 टेस्टमध्ये 32.84 च्या सरासरीने 624 रन केले आहेत, यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. विहारीला टीम इंडियाने फार संधी दिली नाही, तसंच त्याचा बॅटिंग क्रमही वारंवार बदलला जातो. विहारीने टीमसाठी ओपनिंगलाही बॅटिंग केली आहे. त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर चांगला बॅट्समन ठरू शकतो. विहारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 93 मॅच खेळून 54.91 च्या सरासरीने 7,194 रन केले आहेत, यात एक त्रिशतकही आहे. केएल राहुल तंत्राच्या बाबतीत केएल राहुल (KL Rahul) हा भारताच्या सगळ्यात मजबूत खेळाडूपैकी एक आहे. राहुलने टीम इंडियासाठी 36 टेस्टमध्ये 2006 रन केले, यामध्ये 5 शतकं आहेत. राहुलने ओपनर म्हणून टेस्ट क्रिकेट खेळलं आहे, त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यात फार अडचण येणार नाही. 2019 साली राहुल अखेरची टेस्ट खेळला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याची निवड झाली आहे. मयंक अग्रवाल केएल राहुलप्रमाणेच मयंक अग्रवालही (Mayank Agarwal) ओपनिंग बॅट्समन आहे. आपल्या 14 टेस्टच्या छोट्या करियरमध्ये त्याने 2 द्विशतकं केली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये मयंकने 12 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने 857 रन केले. टीम इंडियाने गिलवर विश्वास कायम ठेवला तर मयंक अग्रवालला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते.
  Published by:Shreyas
  First published: