मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : भारतासाठी धोकादायक ठरणार इंग्लंडचे हे 5 क्रिकेटपटू

IND vs ENG : भारतासाठी धोकादायक ठरणार इंग्लंडचे हे 5 क्रिकेटपटू

टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये असे 5-6 खेळाडू आहेत, जे स्वत:च्या जीवावर मॅच एका ओव्हरमध्येच पलटवू शकतात. त्यामुळे भारताला 5 मॅचच्या या टी-20 सीरिजमध्ये या खेळाडूंपासून सावध राहावं लागणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 12 मार्च : टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताला सहज विजय मिळाला असला तरी टी-20 मध्ये मात्र इंग्लंडची कामगिरी गेल्या काही काळात उत्कृष्ट झाली आहे. इंग्लंडच्या टीममध्ये असे 5-6 खेळाडू आहेत, जे स्वत:च्या जीवावर मॅच एका ओव्हरमध्येच पलटवू शकतात. त्यामुळे भारताला 5 मॅचच्या या टी-20 सीरिजमध्ये या खेळाडूंपासून सावध राहावं लागणार आहे.

जॉस बटलर

विकेटकीपर बॅट्समन असलेला जॉस बटलर (Jos Buttler) आक्रमक खेळतो. टॉप ऑर्डरपासून ते मिडल ऑर्डरमध्येही तो त्याच वेगाने बॅटिंग करू शकतो. आपल्या संपूर्ण करियरमध्ये बटलरने इंग्लंडनंतर भारतामध्येच सर्वाधिक मॅच खेळल्या आहेत. आयपीएलमध्येही तो राजस्थानसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा हा अनुभव इंग्लंडला भारताविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही कामाला येईल.

बेन स्टोक्स

बेन स्टोक्स (Ben Stokes) हा सध्या जगातला नंबर एक ऑलराऊंडर आहे. बेन स्टोक्सने इंग्लंडला वर्ल्ड कपसह ऍशेस सीरिजही जिंकवून दिली. पण त्याला भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये छाप पाडता आली नाही. आता टी-20मध्ये तो याचा बदला घ्यायचा प्रयत्न करेल. आयपीएलमध्ये 100 पेक्षा जास्त मॅच खेळलेला स्टोक्स टी-20 सीरिजमध्ये धोकादायक ठरू शकतो.

डेव्हिड मलान

डेव्हिड मलान (David Malan) हा सध्या टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 50 पेक्षा जास्तच्या सरासरीने रन केले आहेत. मलानने 19 टी-20 मॅच खेळल्या असल्या तरी यात त्याने 10 वेळा 50 रनचा आकडा पार केला आहे. यात एका शतकाचाही समावेश आहे.

मोईन अली

भारतीय खेळपट्टीवर गरजेचं असलेलं संतुलन मोईन अली (Moeen Ali) इंग्लंडच्या टीमला देतो. 33 वर्षांचा मोईन अली ऑफ स्पिनसोबतच बॅटिंगमध्येही पर्याय देतो. ओपनिंगपासून खालच्या फळीमध्येही तो बॅटिंग करू शकतो. तिसऱ्या टेस्टमध्ये लागोपाठ तीन सिक्स मारून त्याने आपली ताकद दाखवून दिली होती.

जोफ्रा आर्चर

25 वर्षांचा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) नव्या बॉलसह जुन्या बॉलनेही घातक आहे. आर्चरचा बाऊन्सर आणि यॉर्कर अचूक असल्यामुळे तो आणखी घातक ठरतो. बॉलिंगसह आर्चर तळाला येऊन मोठे शॉटही मारू शकतो.

First published:

Tags: India vs england, T20 cricket