मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियावर सीरिज गमावण्याचं संकट! समोर आलं कारण

IND vs ENG : टीम इंडियावर सीरिज गमावण्याचं संकट! समोर आलं कारण

टीम इंडियावर ओढावलं नवं संकट

टीम इंडियावर ओढावलं नवं संकट

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजची (India tour of England) सुरुवात चांगली केली होती. ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे, पण पुढच्या दोन्ही मॅच गमावण्याचं संकट टीम इंडियासमोर उभं ठाकलं आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 31 ऑगस्ट : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजची (India tour of England) सुरुवात चांगली केली होती. पहिला सामना भारताला पावसामुळे जिंकता आला नाही, तर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडने धमाकेदार पुनरागमन करत मॅच इनिंग आणि 76 रनने जिंकली. आता सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये होणार आहे. या मैदानातलं टीम इंडियाचं रेकॉर्ड अत्यंत खराब आहे.

ओव्हलमध्ये भारताने आतापर्यंत 13 टेस्ट खेळल्या, यातल्या फक्त एका टेस्टमध्ये टीम इंडियाला विजय मिळवाला, तर 5 टेस्ट गमवाव्या लागल्या आणि 7 मॅच ड्रॉ झाल्या. या मैदानात झालेल्या अखेरच्या तिन्ही मॅच भारताने गमावल्या आहेत. 2018 साली झालेली मॅच केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना कायमच लक्षात राहिल.

2018 साली झालेल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडने 332 रन केले होते, यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताचा 292 रनवर ऑल आऊट झाला. हनुमा विहारीने 56 आणि रविंद्र जडेजाने नाबाद 86 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 423/8 वर इनिंग घोषित केली, त्यामुळे भारताला विजयासाठी 464 रनचं आव्हान मिळालं. कोहली, पुजारा आणि विराट शून्य रनवर आऊट झाले. पण केएल राहुलने (KL Rahul) 149 रन आणि ऋषभ पंतने (Rishabh Pant) 114 रनची खेळी केली, पण या दोघांच्या शतकानंतरही भारताला पराभव टाळता आला नाही. 345 रनवर भारताचा ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताचा 118 रनने पराभव झाला.

द्रविडची दोन शतकं

ओव्हलमध्ये भारताकडून राहुल द्रविडने (Rahul Dravid) सर्वाधिक 2 शतकं केली आहेत. तसंच या मैदानात भारताकडून सर्वाधिक 443 रनही द्रविडनेच केले. रवी शास्त्री, सुनिल गावसकर, विजय मर्चंट, कपिल देव, केएल राहुल, अनिल कुंबळे आणि ऋषभ पंत यांना या मैदानात एक-एक शतक करता आलं आहे. विराटची या मैदानातली कामगिरी खराब आहे. 2 टेस्टच्या 4 इनिंगमध्ये विराटने 19 च्या सरासरीने फक्त 75 रन केले आहेत, त्याचा सर्वाधिक स्कोअर 49 रन आहे.

मॅनचेस्टरमध्येही खराब रेकॉर्ड

टीम इंडिया दौऱ्यातली अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये खेळणार आहे. या मैदाताही टीमची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 1936 पासून म्हणजेच 85 वर्षात भारताने या मैदानात 9 टेस्ट खेळल्या, यातल्या एकाही टेस्टमध्ये भारताला विजय मिळाला नाही. 4 मॅच टीमने गमावल्या, तर 5 मॅच ड्रॉ झाल्या. 2014 साली झालेल्या टेस्टमध्ये इंग्लंडने भारताचा इनिंग आणि 54 रनने पराभव केला होता.

First published:

Tags: India vs england