Home /News /sport /

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, 2 जणांची सरप्राइझ एंट्री

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, 2 जणांची सरप्राइझ एंट्री

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतहासिक विजय मिळवल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची (India vs England) निवड झाली आहे.

    मुंबई, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऐतहासिक विजय मिळवल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची (India vs England) निवड झाली आहे. या सीरिजसाठी विराट कोहली पितृत्वाच्या रजेवरून परत आला आहे. तर इशांत शर्मा याचंही दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन झालं आहे. IPL दरम्यान दुखापतीमुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. पृथ्वी शॉ याला मात्र भारतीय टीममधून डच्चू मिळाला आहे. BBCI ने या 18 जणांच्या टीमची अधिकृत घोषणा अद्याप केली नसली तरी, प्रसिद्ध क्रिकेटविषयक प्लॅटफॉर्मवरून टीम इंडिया जाहीर झाली आहे. हनुमा विहारी, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं आहे. या तिघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. विहारीच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला होता, तर शमी आणि जडेजा यांना फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांनाही बाहेर बसावं लागत आहे. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि आर.अश्विन दुखापतीतून सावरल्यामुळे त्यांचीही निवड झाली आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी 18 जणांची भारतीय टीम विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आर.अश्विन, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल. 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश या टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन मॅच 5-9 फेब्रुवारी आणि 13-17 फेब्रुवारीदरम्यान चेन्नईमध्ये होणार आहेत. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. पहिल्या दोन टेस्टसाठी 16-18 खेळाडूंची निवड होऊ शकते, तसंच काही नेट बॉलरनाही संधी दिली जाऊ शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या