Home /News /sport /

IND vs ENG : कोहलीच्या या 4 निर्णयांवर होतेय टीका, टीम इंडियाने गोंधळ वाढवला?

IND vs ENG : कोहलीच्या या 4 निर्णयांवर होतेय टीका, टीम इंडियाने गोंधळ वाढवला?

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या काही निर्णयांवर क्रिकेट चाहत्यांसोबतच माजी क्रिकेटपटूही टीका करत आहेत. टीम इंडियाचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही विराट कोहलीच्या चार निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 18 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) घेतलेल्या काही निर्णयांवर क्रिकेट चाहत्यांसोबतच माजी क्रिकेटपटूही टीका करत आहेत. टीम इंडियाचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही विराट कोहलीच्या चार निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विराटने घेतलेल्या या निर्णयांमागचा त्याचा विचार अजिबात समजत नसल्याचं लक्ष्मण म्हणाला. पहिला निर्णय- विराट कोहलीने रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) तिसऱ्या टी-20 मधून बाहेर ठेवण्याचा निर्णय हैराण करणारा होता. लक्ष्मणने विराटसोबतच टीम इंडियाच्या मॅनेजमेंटच्या विचारावरही प्रश्न उपस्थित केले. सूर्यकुमार यादवला बाहेर बसवण्याचा निर्णय पाहून मी चक्रावून गेलो, असं लक्ष्मण म्हणाला. दुसरा निर्णय- तिसऱ्या टी-20 मध्ये इशान किशनला (Ishan Kishan) ओपनिंगवरून हटवण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचं लक्ष्मणने सांगितलं. पदार्पणाच्या मॅचमध्येच इशान किशनने अर्धशतक करून भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याचा बॅटिंग क्रम बदलवण्यात काहीच अर्थ नव्हता, असं वक्तव्य लक्ष्मणने केलं. तिसऱ्या टी-20 मध्ये किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. तिसरा निर्णय- पॉवरप्लेमध्ये युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) बॉलिंग द्यायच्या निर्णयावरही लक्ष्मणने प्रश्न उपस्थित केले. जेव्हा तुमच्याकडे वॉशिंग्टन सुंदरसारखा (Washington Sundar) पॉवरप्ले स्पेशलिस्ट बॉलर असताना त्याच्याऐवजी चहलला बॉलिंग देणं योग्य नव्हतं, अशी टीका लक्ष्मणने केली. चौथा निर्णय- लक्ष्मण टीम इंडियाच्या अंतिम-11 खेळाडूंच्या निवडीवरही नाराज होता. भारताने बॅटिंग जास्त मजबूत केली आणि एक बॉलर कमी घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, असं लक्ष्मणने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या