मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : बॉलिंग-बॅटिंग नाही, तर ही गोष्ट ठरवणार सीरिजचा निकाल!

IND vs ENG : बॉलिंग-बॅटिंग नाही, तर ही गोष्ट ठरवणार सीरिजचा निकाल!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसऱ्या टी-20 मॅच रविवारी होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसऱ्या टी-20 मॅच रविवारी होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसऱ्या टी-20 मॅच रविवारी होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला.

मुंबई, 13 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसऱ्या टी-20 मॅच रविवारी होणार आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेटने पराभव केला. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये जिंकून टीम इंडिया सीरिजमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. टी-20 प्रमाणेच टेस्ट सीरिजमध्येही इंग्लंडने चांगली सुरूवात केली होती. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा मोठा विजय झाला, पण शेवटच्या तिन्ही टेस्ट त्यांना गमवाव्या लागल्या.

भारतात होणाऱ्या टी-20 मॅचच्या रेकॉर्डवर नजर टाकली, तर बॉलिंग आणि बॅटिंगपेक्षा टॉसच (Toss) महत्त्वाची भूमिका बजावतो. टीम इंडियाने घरच्या मैदानात 1 जानेवारी 2019 पासून 13 टी-20 मॅच खेळल्या. यातल्या 10 मॅच आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमने जिंकल्या, म्हणजे 77 टक्के विजय आव्हानाचा पाठलाग करताना मिळाले आहेत.

टी-20 मॅच या संध्याकाळी 7 वाजता सुरू होतात. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये धुक्यामुळे स्पिन बॉलरना बॉल पकडणंही कठीण असतं. मनगटाने बॉल वळवणाऱ्या (ऑफ स्पिनर) स्पिनरना मात्र याचा फारसा त्रास होत नाही. पहिल्या मॅचमध्ये टॉस गमावल्यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) धुक्याचं महत्त्व सांगितलं होतं. भारतीय बॉलर नेटमध्ये ओल्या बॉलने सराव करत आहेत, असं विराट म्हणाला.

1 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 5 मॅचमध्ये टॉस जिंकला, यातल्या 4 मॅचमध्ये त्यांनी पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सगळ्या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बंगळुरूमध्ये पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भारताचा पराभव झाला. मागच्या दोन वर्षात आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सगळ्या मॅचमध्ये विजय संपादन केला. पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या काळात देशात थंडी असते, त्यामुळे धुक्याचं प्रमाण आणखी जास्त असेल, त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसी मॅचची वेळ बदलणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जर मॅच दुपारी 3 वाजता सुरू झाली, तर टॉस एवढा महत्त्वाचा ठरणार नाही.

First published:
top videos

    Tags: India vs england, T20 cricket