Home /News /sport /

EXPLAINER : वादात सापडलेला क्रिकेटच्या मैदानातला सॉफ्ट सिग्नल, 3D आणि 2D चा गोंधळ

EXPLAINER : वादात सापडलेला क्रिकेटच्या मैदानातला सॉफ्ट सिग्नल, 3D आणि 2D चा गोंधळ

आयसीसीने थेट थर्ड अंपायरचा (Third Umpire) पर्याय उपलब्ध करून दिला, पण तरीही हे वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या चौथ्या टी-20 मॅचमध्येही हा वाद पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या विकेटवरून हा मुद्दा आता पुन्हा तापला आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 18 मार्च : क्रिकेटच्या मैदानात अंपायरनी (Cricket Umpire) दिलेले निर्णय अनेकवेळा वादात सापडत असतात. 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेच्या कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकता आला, तर न्यूझीलंडच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला. 90 च्या दशकात अंपायरच्या चुकीच्या निर्णयांमुळे होत असलेले वाद कमी करण्यासाठी आयसीसीने थेट थर्ड अंपायरचा (Third Umpire) पर्याय उपलब्ध करून दिला, पण तरीही हे वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या चौथ्या टी-20 मॅचमध्येही हा वाद पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या विकेटवरून हा मुद्दा आता पुन्हा तापला आहे. काय आहे सॉफ्ट सिग्नल? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे होणारे वाद कमी करण्यासाठी आयसीसीने सॉफ्ट सिग्नलचा नियम क्रिकेटमध्ये आणला, पण यावरून वाद कमी व्हायच्याऐवजी गोंधळ जास्तच वाढला. सॉफ्ट सिग्नल म्हणजे मैदानातला अंपायर खेळाडू आऊट आहे का नाही, याबाबत साशंक असेल तर तो थर्ड अंपायरकडे जातो, त्यावेळी तो बॅट्समन आऊट आहे का नाही, याचा सॉफ्ट सिग्नल देतो. पण जर मैदानातला अंपायर जर स्वत:च साशंक असेल, तर तो सॉफ्ट सिग्नल तरी कसा देऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सॉफ्ट सिग्नलच्या या वादावर क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी ट्वीट करत याचं कारण सांगितलं आहे. का आला सॉफ्ट सिग्नलचा नियम? सॉफ्ट सिग्नलचा नियम यायच्या आधी मैदानातले अंपायर कोणतीही शंका असेल तर थेट थर्ड अंपायरकडे जायचे, पण थर्ड अंपायरपुढे 3D मॅचच्या 2D इमेज यायच्या आणि त्यावरून त्याला निर्णय द्यावा लागायचा. 2D इमेजमध्ये फिल्डरची बोटं बॉलच्या खाली आहेत का बॉल जमिनीला लागला आहे, हे सांगणं थर्ड अंपायरसाठी कठीण होतं. खेळामध्ये कोणत्याही निर्णयावर शंका असेल तर त्याचा फायदा बॅट्समनला मिळायचा आणि थर्ड अंपायर नॉट आऊट द्यायचा. पुरेसे पुरावे थर्ड अंपायरकडे नसल्यामुळे बहुतेकवेळा बॅट्समनला याचा फायदा व्हायचा, अखेर आयसीसीने सॉफ्ट सिग्नलचा नियम आणला. त्यामुळे मैदानातल्या अंपायरने थर्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल आऊट दिला आणि थर्ड अंपायरकडे पुरेसे पुरावे नसतील तर बॅट्समनला आऊट दिलं जातं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Icc, India vs england

    पुढील बातम्या