मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : आयपीएलमध्ये धमाका करूनही या खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मध्ये संधी नाही!

IND vs ENG : आयपीएलमध्ये धमाका करूनही या खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मध्ये संधी नाही!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला आजपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये (IPL) धमाकेदार कामगिरी करूनही भारतीय टीमच्या अंतिम-11 मध्ये अनेकांना संधी मिळणार नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 12 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला आजपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडला सहज हरवल्यानंतर भारताला टी-20 सीरिज मात्र तेवढी सोपी जाणार नाही. याच कारणामुळे भारत टी-20 सीरिजमध्ये मजबूत टीमसह उतरेल. याचवर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. ही सीरिज वर्ल्ड कपसाठीची रंगीत तालिम ठरणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारताकडे बरेच पर्याय आहेत. टीममध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शिखर धवन यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंसोबतच सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, राहुल तेवतिया, अक्षर पटेल हे खेळाडूही आहेत. त्यामुळे विराट कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. म्हणजेच या टीममध्ये प्रत्येक खेळाडूसाठी पर्याय आहे.

कोणाला संधी?

ओपनिंगला रोहित शर्मा आणि केएल राहुल खेळतील हे विराटने आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे शिखर धवनला बाहेर बसावं लागणार आहे. तर हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांचं स्थान पक्क आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऋषभ पंतलाही संधी मिळू शकते. तसंच ऑलराऊंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची निवड होईल. फास्ट बॉलिंगची जबाबदारी भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांच्यावर असेल.

संभाव्य टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार

या खेळाडूंना संधी नाही

शिखर धवन, इशान किशन, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, राहुल टेवटिया, राहुल चहर, सूर्यकुमार यादव

First published:

Tags: Cricket, India vs england, Sports, T20 cricket