मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : टी-20 वर्ल्ड कपआधी समोर आली हार्दिक पांड्याची मोठी 'कमजोरी'

IND vs ENG : टी-20 वर्ल्ड कपआधी समोर आली हार्दिक पांड्याची मोठी 'कमजोरी'

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चौथ्या टी-20 मॅचमध्ये बॉलने कमाल केली. पण आपल्या मोठ्या शॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याला या सीरिजमध्ये बॅटने खास कामगिरी करता आली नाही.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 19 मार्च : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चौथ्या टी-20 मॅचमध्ये बॉलने कमाल केली. पण आपल्या मोठ्या शॉट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्याला या सीरिजमध्ये बॅटने खास कामगिरी करता आली नाही. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) होणार आहे, त्याआधी पांड्याला त्याच्या बॅटिंगमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. या सीरिजची शेवटची मॅच शनिवारी खेळवली जाणार आहे. ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहे, कारण सीरिज सध्या 2-2 ने बरोबरीत आहे. शेवटची मॅच जिंकणारी टीम सीरिजवर कब्जा करेल.

हार्दिक पांड्याला या सीरिजमध्ये शॉर्ट पिच बॉलिंगचा सामना करताना अडचणी येत असल्याचं दिसून आलं. तसंच त्याला जलद रनही करता येत नाहीयेत. तीन इनिंगमध्ये त्याने फक्त 107 च्या स्ट्राईक रेटने 44 बॉलमध्ये 47 रन बनवले. यादरम्यान त्याने 1 फोर आणि 4 सिक्स मारले. तिन्ही मॅचमध्ये तो फास्ट बॉलरसमोरच आऊट झाला. टी-20 करियरमध्ये हार्दिक पांड्याने 143 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी हार्दिक पांड्याची कमजोरी समोर आणली आहे. 'हार्दिकची बॅट चालत नाहीये. इंग्लंडचे फास्ट बॉलर त्याला बाऊन्सर टाकत आहेत. शॉर्ट पिच बॉलिंगवर खेळायला त्याला अडचणी येत आहेत. त्याला जलद रन करता येत नसल्यामुळे टीमलाही नुकसान होत आहे. इंग्लंडला पांड्याला रोखण्याचं हत्यार सापडलं आहे,' असं रमीझ राजा म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने उत्कृष्ट कामगिरी केली. तीन वनडे मॅचच्या त्या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव झाला होता, पण हार्दिकने 3 मॅचमध्ये 105 च्या सरासरीने सर्वाधिक 210 रन केले होते, यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.

हार्दिक पांड्याला बॅटिंगमध्ये संघर्ष करावा लागत असला, तरी त्याने बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सीरिजमध्ये हार्दिकने 13 ओव्हर टाकून फक्त 6.46 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत 2 विकेट घेतल्या. चौथ्या टी-20 मध्ये त्याला नव्या बॉलने बॉलिंग करण्याची संधी मिळाली. या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 2 विकेट घेतल्या, त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 4 रन प्रती ओव्हर होता. हार्दिकच्या या बॉलिंगमुळे इंग्लंडला आव्हानाचा पाठलाग करता आला नाही.

First published:

Tags: Cricket news, Hardik pandya, India vs england, T20 world cup