Home /News /sport /

IND vs ENG : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झाल्यानंतर सूर्यकुमार काय करत होता?

IND vs ENG : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न झाल्यानंतर सूर्यकुमार काय करत होता?

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची भारतीय टीममध्ये (India vs England) निवड झाली आहे, यानतंर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 23 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची भारतीय टीममध्ये (India vs England) निवड झाली आहे, यानतंर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपली निवड न झाल्यामुळे निराश झाल्याचं सूर्याने मान्य केलं आहे. आयपीएल 2020 (IPL 2020) मधल्या शानदार कामगिरीनंतर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला सामील केलं जाईल, असं वाटल्याचंही सूर्यकुमार म्हणाला. स्थानिक क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव सध्या बेस्ट फिनिशर आहे. 2019-2020 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 168च्या स्ट्राईक रेटने आणि 113 च्या सरासरीने 392 रन केले. या कामगिरीमुळे सूर्याला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी आपली निवड होईल, असं वाटल्याचं सूर्यकुमार म्हणाला. मागच्या काही आयपीएलमध्ये त्याने स्वत:ला सिद्ध केलं. 2018, 2019 आणि 2020 सालच्या आयपीएलमध्ये सूर्याने 512, 424 आणि 480 रन केले. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जिंकवण्यातही सूर्यकुमारने मोलाची भूमिका बजावली. पण तरीही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. अखेर मागच्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी सूर्याला संधी मिळाली. इंडिया टुडेशी बोलताना सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न होणं स्वीकार करणं आपल्यासाठी कठीण असल्याचं सांगितलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यामुळे आपण मुंबईच्या समुद्रावर एकटेच फिरायला जायचो, पण रन करण्याची आपली भूक कमी झाली नाही, असं तो म्हणाला. जेव्हा मी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये आलो तेव्हा तिकडे खूप खेळाडू बसले होते. तू खूप मेहनत करतोस, फक्त योग्य वेळेची वाट पाहा, तुला संधी नक्की मिळेल, असं त्यांनी मला समजावल्याचंही सूर्यकुमारने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या