IND vs ENG : दुसऱ्या टेस्टमध्ये याला संधी दे, गावसकरांचा सल्ला, पण विराट म्हणतो...

IND vs ENG : दुसऱ्या टेस्टमध्ये याला संधी दे, गावसकरांचा सल्ला, पण विराट म्हणतो...

शनिवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराटने (Virat Kohli) कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी द्यावी, अशी मागणी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे.

  • Share this:

चेन्नई, 10 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 227 रनने दारूण पराभव झाला. इंग्लंडचा भारतीय जमिनीवरचा हा सगळ्यात मोठा विजय आहे, तर दुसरीकडे चेन्नईच्या मैदानात 22 वर्षानंतर टीम इंडियाने टेस्ट मॅच गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराटने (Virat Kohli) कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी द्यावी, अशी मागणी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केली आहे.

कुलदीप यादवला संधी द्यायची असेल, तरी वॉशिंग्टन सुंदरला टीमबाहेर ठेवू नये, असंही गावसकर यांनी सांगितलं आहे. सुंदरच्या बॉलिंगमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या खेळून आणि अश्विनबरोबर चर्चा करून दूर होतील, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे. सुंदरने पहिल्या टेस्टमध्ये 26 ओव्हर टाकल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही, पण बॅटिंगमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. सुंदर हा टी-20 बॉलर असल्यामुळे तो बॉलला फ्लाईट देत नाही, अश्विनकडून तो याबाबत शिकू शकतो, असं मत गावसकर यांनी मांडलं.

गावसकरांनी सांगितल्याप्रमाणे जर कुलदीप यादवला संधी दिली, तर शाहबाज नदीमला बाहेर बसावं लागू शखतं. नदीमने पहिल्या टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या, तरी त्याने तब्बल 233 रन दिले.

काय म्हणाला विराट?

एकीकडे गावसकर यांनी कुलदीप यादवला टीममध्ये घेण्याचा सल्ला दिला असला, तरी पहिल्या टेस्टमध्ये शाहबाज नदीमला खेळवण्याबाबत आपल्याला कोणताही पसतावा नसल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. कुलदीप यादव, अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिघं बॉल आतमध्ये आणतात, त्यामुळे बॉलिंगमध्ये विविधता हवी, असं विराटने सांगितलं. विराटच्या या वक्तव्यामुळे कुलदीप यादवला संधी मिळते, का अक्षर पटेलला हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारताची संभाव्य टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा

Published by: Shreyas
First published: February 10, 2021, 12:53 PM IST

ताज्या बातम्या