Home /News /sport /

IND vs ENG : 'त्याने दुखापत लपवायची गरज नव्हती', गिलवर गंभीर आरोप

IND vs ENG : 'त्याने दुखापत लपवायची गरज नव्हती', गिलवर गंभीर आरोप

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे. ओपनर शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाल्यामुळे तो सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नसल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 4 जुलै : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे. ओपनर शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाल्यामुळे तो सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नसल्याचं वृत्त आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) पराभव केला, या सामन्यात शुभमन गिल खेळला होता, पण यानंतर काही दिवसांमध्येच गिलला दुखापत झाल्याचं समोर आलं. आता गिलच्या दुखापतींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गिलला जर या दुखापतीबाबत माहिती होतं, तर त्याने इंग्लंडला जायलाच नको होतं, असं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू साबा करीम (Saba Karim) यांनी मांडलं आहे. गिलने त्याची दुखापत लपवायला नको होती, असंही साबा करीम म्हणाले आहेत. 'गिलने त्याची दुखापत लपवली हे पाहून मला धक्का बसला. तो बराच काळ टीम इंडियासोबत प्रवास करत आहे. फिजियो आणि वैद्यकीय टीम खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष ठेवतं. अशा गोष्टी होणं आश्चर्यकारक आहे आणि हे आधीच कसं कळलं नाही?' असा सवाल साबा करीम यांनी उपस्थित केला. 'मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) संधी दिली गेली पाहिजे, कारण 2-3 अपयशांनंतर त्याला बाहेर करण्यात आलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर तो बेंचवरच बसून आहे,' अशी प्रतिक्रिया साबा करीम यांनी दिली. भारताचा आणखी एक माजी क्रिकेटपटू निखील चोप्रा (Nikhil Chopra) यानेही मयंक अग्रवालला संधी मिळावी असं वक्तव्य केलं आहे. 'तुम्ही रोहित शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूसाठी एक नियम आणि इतर खेळाडूंसाठी दुसरा नियम ठेवू शकत नाही. जे खेळाडू टीममध्ये आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. मयंक अग्रवाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीमबाहेरून खेळाडू आणणं आणि मयंक तिकडे असूनही त्याला बाहेर ठेवलं तर चुकीचा संदेश जाईल,' असं निखील चोप्रा म्हणाला. भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनीही बाहेरून खेळाडूला आणू नये, अशीच भूमिका मांडली. 'टीम बाहेरून खेळाडू आणण्याची गरज नाही. निवड समितीलाही थोडा मान दिला पाहिजे. त्यांनी टीमची निवड केली आहे आणि विराट-शास्त्रीसोबत चर्चा केल्याशिवाय टीमची निवड होऊ शकत नाही. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल हे दोन मोठे खेळाडू तुमच्यासोबत आहेत, तरीही तिसऱ्या ओपनरची तुम्हाला गरज आहे का? मला तरी वाटत नाही,' असं कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले. गिलला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये नेण्याची तयारी सुरु असल्याची वृत्त प्रसिद्ध होत आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england

    पुढील बातम्या