मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाच्या धमाकेदार कामगिरीत लपून राहिला या खेळाडूचा फ्लॉप शो!

IND vs ENG : टीम इंडियाच्या धमाकेदार कामगिरीत लपून राहिला या खेळाडूचा फ्लॉप शो!

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ही धमाकेदार कामगिरी केली असली तरी यात ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill)ची निराशाजनक कामगिरी मात्र लपून राहिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 1 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने (India vs England) धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने ही धमाकेदार कामगिरी केली असली तरी यात ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill)ची निराशाजनक कामगिरी मात्र लपून राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या 3 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये शुभमन गिलने फक्त एक अर्धशतक केलं आहे. तर दुसरीकडे मयंक अग्रवालचं (Mayank Agarwal) घरच्या मैदानातलं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. चार मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पण सीरिजची चौथी टेस्ट भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय टीमला हा सामना ड्रॉ केला तरी चालणार आहे. न्यूझीलंडची टीम याआधीच फायनलला पोहोचली आहे.

या दौऱ्यात शुभमन गिलने चांगली सुरूवात केली होती. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये गिलने 29 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये 50 रन केले. कर्णधार विराट कोहलीनेही गिलच्या या खेळीचं कौतुक केलं होतं, पण भारतीय टीमला ही मॅच गमवावी लागली होती. पहिल्या टेस्टनंतर मात्र गिलला फार काही करता आलं नाही. चेन्नईमध्येच झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये तो 0 आणि 14 रनच करू शकला.

अहमदाबादमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्येही गिल फ्लॉप ठरला. पहिल्या इनिंगमध्ये जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलवर तो आऊट झाला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये तो 15 रनवर नाबाद राहिला. चार इनिंगमध्ये गिलला फास्ट बॉलरने आऊट केलं.

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी गिलने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 45, 35, 50, 31, 7 आणि 91 रन केले. ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याने सुरूवातही चांगली करून दिली. कांगारूंविरुद्ध त्याने दोन अर्धशतकं केली आणि तीन इनिंगमध्ये 30 पेक्षा जास्त रनची खेळी केली. टेस्ट करियरमध्ये त्याने 6 मॅच खेळून 38 च्या सरासरीने 378 रन केले. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे मयंकला त्याने खेळलेल्या मागच्या चार टेस्टमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही. पण घरच्या मैदानात त्याची सरासरी 100 आहे.

मयंकला ऑस्ट्रेलियात पहिल्या दोन टेस्टमध्ये ओपनिंगची संधी मिळाली होती, पण त्याला अपयश आलं. चार इनिंगमध्ये त्याने 17, 9, 0, 5 रनच केले. खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या शेवटच्या टेस्टमध्येही मयंकला संधी मिळाली, त्यावेळी तो पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. या मॅचमध्ये त्याने 38 आणि 9 रन करून आऊट झाला. टेस्टच्या शेवटच्या 8 इनिंगमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आलेलं नाही, तसंच त्याचा सर्वाधिक स्कोअर 38 रन आहे. पण भारतीय मैदानात मयंकने 5 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये जवळपास 100 च्या सरासरीने 597 रन केले आहेत, यात 3 शतकं आहेत.

First published: