मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज सुरु व्हायला अजून एक महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी बाकी आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 30 जून : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज सुरु व्हायला अजून एक महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी बाकी आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा ओपनर शुभमन गिल (Shubhaman Gill) दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजपासूनच शुभमन गिलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्येही (World Test Championship Final) गिल अपयशी ठरला.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, शुभमन गिल 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे. शुभमन गिलला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, याबाबत अजून टीम प्रशासनाकडून स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलं नाही. शुभमन गिलला हॅमस्ट्रिंग किंवा पोटरीला दुखापत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गिल मोठ्या कालावधीसाठी टीममधून बाहेर झाला असला तरी तो मायदेशी न परतता इंग्लंडमध्ये टीमसोबतच राहिल. टेस्ट सीरिजदरम्यान तो पुन्हा फिट होईल, अशी अपेक्षा टीमला आहे.

नासीर हुसेनची टीका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने शुभमन गिलवर टीका केली होती. फायनलमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळणं कठीण आहे. त्याच्याऐवजी मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) किंवा केएल राहुलला (KL Rahul) संधी मिळू शकते, असं हुसेन म्हणाला होता.

खेळाडूंची विश्रांती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू 20 दिवसांच्या ब्रेकवर आहेत. 14 जुलैला खेळाडू पुन्हा एकत्र येणार आहेत. यानंतर इंट्रा स्क्वॅड मॅच खेळल्या जाणार आहेत. भारत-इंग्लंड यांच्यातली 5 टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारताचा 4-1 ने पराभव झाला होता. यावेळी विराट कोहली या पराभवाचा बदला घेण्यासाठी तयार असेल.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Team india