अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हापासून तो सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह झाला आहे. सेहवागचे ट्विट आणि मीम्स कायम चर्चेचा विषय असतो. क्रिकेटच्या प्रत्येक घटनेसाठी सेहवागकडे मजेदार व्हिडिओ असतात. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टमध्ये स्पिन बॉलिंगसमोर इंग्लंडचे बॅट्समन धारातिर्थी पडले. यावरही सेहवागने एक व्हिडिओ शेयर केला. हा व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आहे.
अहमदाबादच्या मोटेरावर सुरू असलेल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय स्पिनरसमोर इंग्लंडच्या बॅट्समननी गुडघे टेकले. फक्त 112 रनवर इंग्लंडचा ऑल आऊट झाला. जॅक क्रॉली सोडला तर कोणत्याच इंग्लिश बॅट्समनला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडची बॅटिंग गडगडल्यानंतर सेहवागने राहुल गांधींचा एक व्हिडिओ शेयर केला. राहुल गांधींचा हा व्हिडिओ निवडणूक प्रचारसभेतला आहे. या व्हिडिओमध्ये ते खत्म.... बाय बाय... टाटा गुडबाय.... गया.... असं म्हणत आहेत.
England batsman as soon as they come on the wicket #INDvENG pic.twitter.com/vDpRgrsnP1
— Virender Sehwag (@virendersehwag) February 24, 2021
पहिल्या इनिंगमध्ये 112 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडने बॉलिंगमध्ये शानदार पुनरागमन केलं. दुसऱ्या दिवशी भारतीय टीमचा 145 रनवर ऑल आऊट झाला. जो रूटने 5 तर जॅक लीचने 4 विकेट घेतल्या. जोफ्रा आर्चरला एक विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.