Home /News /sport /

IND vs ENG : अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचं लोटागंण, भारताला मोठी आघाडी

IND vs ENG : अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचं लोटागंण, भारताला मोठी आघाडी

आर.अश्विनच्या (R.Ashwin) फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे. चेन्नईतल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) फक्त 134 रनवर ऑल आऊट झाला आहे

    चेन्नई, 14 फेब्रुवारी : आर.अश्विनच्या (R.Ashwin) फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे. चेन्नईतल्या दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) फक्त 134 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये 195 रनची मोठी आघाडी मिळाली आहे. भारताकडून अश्विनने 5 विकेट घेतल्या, तर इशांत शर्मा आणि अक्षर पटलेला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून विकेट कीपर बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद 42 रन केले. अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 29व्यांदा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने 329 रनपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचं शतक तसंच अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकामुळे भारताने 300 रनचा टप्पा ओलांडला. रोहित आणि अजिंक्य यांच्यात चौथ्या विकेटसाठी 310 बॉलमध्ये 162 रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली स्टोनला 3 विकेट, जॅक लीचला 2 आणि जो रूटला एक विकेट मिळाली. याआधी पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रनने पराभव झाला होता. इंग्लंडचा भारतीय भूमीवरचा सगळ्यात मोठा विजय होता, तसंच भारताने 22 वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईमध्ये टेस्ट मॅच गमावली. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये आता इंग्लंड 1-0 ने पुढे आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Final) प्रवेश मिळवण्यासाठी आता भारताला फक्त दुसरी टेस्टच नाही, तर सीरिजही जिंकावी लागणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्येही जर भारताचा पराभव झाला, तर विराटचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळण्याचं स्वप्न भंगेल. 18 ते 22 जूनदरम्यान लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. न्यूझीलंडची टीम आधीच या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या