मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : विराट पुन्हा 'शब्द' फिरवणार; दुसऱ्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी!

IND vs ENG : विराट पुन्हा 'शब्द' फिरवणार; दुसऱ्या टी-20 मध्ये या खेळाडूंना संधी!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवड प्रक्रियेवर टीका होत आहे. मॅचच्या 24 तास आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळतील, असं विराटने सांगितलं होतं.

पुढे वाचा ...

अहमदाबाद, 13 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने दारूण पराभव झाला. या पराभवानंतर टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवड प्रक्रियेवर टीका होत आहे. मॅचच्या 24 तास आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला खेळतील, असं विराटने सांगितलं होतं. पण पहिल्या टी-20 च्या टॉसवेळी विराटने सगळ्यांना धक्का दिला आणि रोहित शर्माला पुढच्या दोन मॅचसाठी विश्रांती दिल्याचं सांगितलं. 24 तासांपूर्वी रोहितच्या खेळण्याची घोषणा झाल्यानंतर मॅचवेळी नेमकं असं काय झालं? असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारत आहेत.

पहिल्या टी-20मध्ये मानहानीकारक पराभव झाल्यामुळे आता दुसऱ्या मॅचमध्ये विराटवर रोहितला खेळवण्यासाठी दबाव असेल, त्यामुळे रोहितचं टीममध्ये पुनरागमन झालं तर दोनच दिवसात विराट कोहलीवर त्याचे शब्द दोनदा फिरवण्याची वेळ येईल. रोहित शर्मा मागच्या सहा टेस्टमध्ये लागोपाठ खेळला आहे, तसंच त्याआधी तो ऑस्ट्रेलियात 14 दिवस क्वारंटाईन होता, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली.

पहिल्या टी-20 मध्ये श्रेयस अय्यर वगळता कोणत्याच भारतीय बॅट्समनना मोठी खेळी करता आली नाही. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडच्या नेतृत्वातल्या इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगचा सामना भारताला करता आला नाही. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला फास्ट बॉलरना मिळणाऱ्या जास्तच्या बाऊन्सचा सामना करता आला नाही.

सूर्यकुमारला वाट पाहावी लागणार

या मॅचमध्ये श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये पदार्पण करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. मॅचनंतर विराटने श्रेयस अय्यरचंही कौतुक केलं. बाऊन्स मिळणाऱ्या खेळपट्टीवर क्रीजचा वापर कसा करायचा, ते श्रेयसने दाखवून दिलं. इतर बॅट्समनना असं करता आलं नाही, असं विराट म्हणाला.

दुसऱ्या टी-20 मध्ये विराटकडे युझवेंद्र चहलऐवजी राहुल टेवटियाचा पर्यायही उपलब्ध आहे. टेवटिया स्पिन बॉलिंगसह आक्रमक बॅटिंगही करू शकतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी टीम संतुलित करण्यासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन (रिझर्व्ह विकेटकीपर)

First published:
top videos

    Tags: India vs england, Rohit sharma, Virat kohli