• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : स्टोक्सला रन आऊट न दिल्याने भडकला विराट, अंपायरशीच घेतला पंगा

IND vs ENG : स्टोक्सला रन आऊट न दिल्याने भडकला विराट, अंपायरशीच घेतला पंगा

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या दुसऱ्या वनडेमध्येही अंपायरच्या निर्णयावरून वाद पाहायला मिळाला. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) रन आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज झाला.

 • Share this:
  पुणे, 27 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या दुसऱ्या वनडेमध्येही अंपायरच्या निर्णयावरून वाद पाहायला मिळाला. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सला (Ben Stokes) रन आऊट न दिल्यामुळे हा वाद झाला. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना 26 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) बॉलिंगवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. तिकडे फिल्डिंगला उभ्या असलेल्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) बॉल पकडून विकेट कीपर ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) थ्रो केला. स्टोक्सला आपण दुसरी रन आरामात पूर्ण करू असं वाटलं, पण कुलदीपचा थ्रो स्टम्पवर येतोय असं दिसताच स्टोक्सने वेग वाढवला आणि बॅट क्रीजच्या आत टेकवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बॉल स्टम्पला लागला होता. बॉल स्टम्पला लागल्यानंतर भारताने रन आऊटचं अपील केलं, त्यामुळे निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला. टीव्ही रिप्लेमध्ये स्टोक्सच्या बॅटचा कोणताही भाग क्रीजच्या आतमध्ये दिसत नव्हता, त्यामुळे तो आऊट वाटत होता, पण तरीही थर्ड अंपायरने संशयाचा फायदा घेऊन स्टोक्सला नॉट आऊट दिलं. थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाराज झाला. यानंतर तो लगेच मैदानतले अंपायर नितीन मेनन (Nitin Menon) यांच्याजवळ गेला आणि वाद घालायला लागला. स्टोक्सची बॅट क्रीजच्या आतमध्ये नसतानाही त्याला नॉट आऊट कसं दिलं? असा सवाल विराटने विचारला. दुसरीकडे कॉमेंट्री करत असलेल्या आकाश चोप्रा (Aakash Chopra) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनीही स्टोक्स आऊट असल्याचं सांगितलं. तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही स्टोक्स आऊट असल्याचं ट्वीट केलं. भारत आणि इंग्लंड सीरिजमध्ये अंपायरचा सॉफ्ट सिग्नल (Soft Signal) आणि डीआरएसमधला अंपायर्स कॉल (DRS Umpires Call) यावरून याआधीच वाद निर्माण झाला आहे. विराट कोहलीने हे दोन्ही नियम रद्द करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. यानंतर आयसीसी (ICC) सॉफ्ट सिग्नलचा नियम रद्द करण्याच्या विचारात आहे, पण अंपायर्स कॉलचा नियम कायम राहणार असल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं आहे. बेन स्टोक्सला ज्यावेळी जीवदान मिळालं, त्यावेळी तो 28 बॉलमध्ये 33 रनवर खेळत होता. यानंतर त्याने जोरदार फटकेबाजी करत 52 बॉल खेळून 10 सिक्सच्या मदतीने 99 रन केले. स्टोक्सच्या या खेळीमुळे इंग्लंडचा दुसऱ्या वनडेमध्ये विजय झाला.
  Published by:Shreyas
  First published: