Home /News /sport /

IND vs ENG : सचिन-धोनीचा जबरा फॅन पुण्याच्या टेकडीवर, टीम इंडियाला केलं Cheer!

IND vs ENG : सचिन-धोनीचा जबरा फॅन पुण्याच्या टेकडीवर, टीम इंडियाला केलं Cheer!

कोरोनामुळे (Corona)सध्या सुरु असलेले भारत विरुद्ध इंग्लड मालिकेतील (India Vs England Series)सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. या स्थितीतही काही चाहते खेळाडूंना अनेक प्रकारे प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत.

पुणे, 27 मार्च : जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. हे चाहते आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मैदानावर उपस्थित राहतात. कोरोनामुळे (Corona)सध्या सुरु असलेले भारत विरुद्ध इंग्लड मालिकेतील (India Vs England Series)सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत. या स्थितीतही काही चाहते खेळाडूंना अनेक प्रकारे प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना नुकताच पुण्यात (Pune)झाला. यावेळी स्टेडियमच्या बाजूच्या टेकड्यांवर बसून चाहत्यांनी सामन्याचा आनंद घेतला. यावेळी तो विशेष चाहता देखील उपस्थित असल्याचं दिसून आले. टीम इंडियाच्या या जबरा फॅनचं नाव आहे सुधीर कुमार चौधरी (Sudhir Kumar Choudhary). सुधीर हा क्रिकेट लिजेंड सचिन तेंडुलकरचा निस्सिम चाहता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमला प्रोत्साहन देण्यासाठी तो मैदानात उपस्थिती लावतो. बिहारचा आणि व्यवसायानं शिक्षक असणारा सुधीर हा मैदानातील प्रेक्षकांच्या गर्दीतही लक्षवेधी ठरतो, कारण प्रत्येक सामन्यावेळी तो त्याचे शरीर भारतीय तिरंगाने रंगवतो आणि त्याच्या हातात झेंडा असतो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने बंद स्टेडियममध्ये घेण्यात येत आहेत. त्यामुळे चाहत्यांना सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घेता येत नसताना सुधीर मात्र स्टेडियमपासून दूर असलेल्या डोंगरावरुन टीम इंडियाला (Team India)प्रोत्साहन देताना दिसला.

News18 / Disney+ Hostar पुण्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामान्याला सुधीर टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियम जवळ आला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारतीय टीम बॅटिंगसाठी बोलावलं. यावेळी के.एल.राहुलने तडाखेबंद खेळी करत एकदिवसीय सामन्यांमधील आपले 5 वे शतक ठोकले. यावेळी हा सुपर फॅन स्टेडियम शेजारच्या टेकडीवरून भारतीय टीमला प्रोत्साहन देताना दिसला. या प्रसंगाचा व्हिडीओ अनेक फॅन्सनी शेअर केला आहे. सुधीर हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. त्याने देखील पुणे परिसराचे तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्याचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडचा दणदणीत (India vs England) विजय झाला, याचसोबत त्यांनी 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताने ठेवलेलं 337 रनचं आव्हान इंग्लंडने 39 बॉल आणि 6 विकेट राखून अगदी सहज पूर्ण केलं. जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) 124 रन तर बेन स्टोक्सने (Ben Stokes) 99 रन केले. भारतीय बॉलरना या मॅचमध्ये अपयश आलं स्पिन बॉलरनी तर भरपूर रन दिल्या. कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) 84 रन तर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) 6 ओव्हरमध्ये 72 रन फटकावण्यात आल्या. प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) 2 आणि भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) एक विकेट घेतली.
First published:

Tags: Cricket news, India vs england, Kl rahul, Virat kohli

पुढील बातम्या