पुणे, 26 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी वनडे आज पुण्यात खेळवण्यात येणार आहे. याआधी झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रननी दणदणीत विजय झाला होता, त्यामुळे आता दुसरी वनडे जिंकून सीरिज खिशात टाकण्याचं विराटच्या टीमचं लक्ष्य असेल. पण या मॅचआधी टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खांद्याच्या दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाला आहे, तर पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली होती. बॅटिंग करत असताना रोहितच्या बोटातून रक्तही आलं होतं. त्यामुळे आता दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
श्रेयस अय्यरच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संधी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. तर रोहित जर फिट नसेल तर त्याच्याऐवजी विराटपुढे दोन पर्याय असतील.
राहुल ओपनिंगला तर पंत विकेट कीपर
रोहित जर फिट झाला नाही, तर शिखर धवनसोबत केएल राहुल (KL Rahul) ओपनिंगला येऊ शकतो, तर विकेट कीपिंगची जबाबदारी ऋषभ पंतला (Rishabh Pant) मिळू शकते. गेल्या काही काळापासून केएल राहुल चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करून विकेट कीपिंग करत आहे, त्यामुळे ऋषभ पंतला वनडे टीममध्ये संधी मिळत नाही. टी-20 सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या केएल राहुलने पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक केलं होतं.
शुभमन गिलला संधी
दुसरीकडे विराट कोहलीकडे शुभमन गिल (Shubhaman Gill) याला शिखर धवनसोबत ओपनिंगला पाठवण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. शुभमन गिलला ऑस्ट्रेलियात फक्त एक वनडे खेळण्याची संधी मिळाली होती. गिलने लिस्ट ए करियरमध्ये 45.35 च्या सरासरीने 2313 रन केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, Shreyas iyer, Virat kohli