• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : दुसऱ्या वनडेआधी बेन स्टोक्सने विराटला डिवचलं, म्हणाला...

IND vs ENG : दुसऱ्या वनडेआधी बेन स्टोक्सने विराटला डिवचलं, म्हणाला...

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी वनडे (Second ODI) शुक्रवारी होणार आहे. आता दुसऱ्या वनडेआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) डिवचलं आहे.

 • Share this:
  पुणे, 25 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी वनडे (Second ODI) शुक्रवारी होणार आहे. पहिल्या सामन्यात 66 रनने विजय मिळवलेल्या टीम इंडियाचं लक्ष्य दुसऱ्या मॅचमध्येही विजय मिळवून सीरिज खिशात टाकण्याचं असेल. याआधी भारताचा टेस्ट सीरिजमध्ये 3-1 ने तर टी-20 सीरिजमध्ये 3-2 ने विजय झाला होता. आता दुसऱ्या वनडेआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) डिवचलं आहे. विराट कोहलीला अपयशी होताना बघायचं आहे, असं वक्तव्य स्टोक्सने केलं आहे. मैदानामध्ये विकेट मिळाल्यानंतर विराट कोहलीच्या आक्रमक सेलिब्रेशनविषयी स्टोक्सला प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला, 'प्रत्येक टीम आणि खेळाडू मैदानात वेगवेगळ्या पद्धती अलंबतात, ज्यामुळे त्यांना यश मिळतं. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये ही पद्धत आमच्यासाठी अनुकूल राहिली नाही.' 'आम्ही अशा गोष्टींवर काम करतो ज्या आमच्यासाठी सर्वोत्तम आहेत, ज्यामुळे आमची टीम सर्वश्रेष्ठ बनेल. प्रत्येक टीमची स्वत:ची रणनीती असते,' अशी प्रतिक्रिया स्टोक्सने दिली. तसंच विराट कोहलीने रन करू नये, असं मला वाटतं कारण ते आमच्या टीमसाठी चांगलं नसेल, असं स्टोक्स म्हणाला. जो रूटच्या गैरहजेरीमध्ये बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला खेळत आहे. या क्रमांकावरही आपण आपला नैसर्गिक खेळ करणार असल्याचं स्टोक्सने स्पष्ट केलं. भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये स्टोक्स 1 रन करून आऊट झाला. प्रसिद्ध कृष्णाने स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताने ठेवलेल्या 318 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 251 रनवर ऑल आऊट झाला.
  Published by:Shreyas
  First published: