मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG 2nd ODI : स्टोक्स-बेयरस्टोचा धमाका, टीम इंडियाला पराभवाचा धक्का

IND vs ENG 2nd ODI : स्टोक्स-बेयरस्टोचा धमाका, टीम इंडियाला पराभवाचा धक्का

जॉनी बेयरस्टोचं (Jonny Bairstow) शतक आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) वादळी खेळीमुळे दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) पराभव झाला आहे.

जॉनी बेयरस्टोचं (Jonny Bairstow) शतक आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) वादळी खेळीमुळे दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) पराभव झाला आहे.

जॉनी बेयरस्टोचं (Jonny Bairstow) शतक आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) वादळी खेळीमुळे दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) पराभव झाला आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 26 मार्च : जॉनी बेयरस्टोचं (Jonny Bairstow) शतक आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) वादळी खेळीमुळे दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) पराभव झाला आहे. भारताने ठेवलेलं 337 रनचं आव्हान इंग्लंडने 43.3 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पूर्ण केलं. जॉनी बेयरस्टोने 112 बॉलमध्ये 124 रनची खेळी केली, यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता, तर बेन स्टोक्सने 52 बॉलमध्ये 99 रनची आक्रमक खेळी केली. स्टोक्सने तब्बल 10 सिक्स आणि 4 फोर मारले, त्याने 190.38 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. तर जेसन रॉयनेही 55 रन केले. इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर शून्य रनवर आऊट झाला. डेव्हिड मलान 16 रनवर आणि लियाम लिव्हिंगस्टोन 27 रनवर नाबाद राहिले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाला 2 तर भुवनेश्वर कुमारला 1 विकेट मिळाली.

भारताविरुद्धच्या या विजयाबरोबच इंग्लंडने तीन वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पुनरागमन केलं आहे. याआधी पहिली वनडे भारताने 66 रनने जिंकली होती.

त्याआधी केएल राहुलचं (KL Rahul) शतक आणि विराट कोहली (Virat Kohli)-ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये (India vs England) 50 ओव्हर खेळून 336-6 पर्यंत मजल मारली. टी-20 सीरिजमध्ये अपयशी ठरलेला केएल राहुल वनडे सीरिजमध्ये फॉर्ममध्ये परतला. याआधी त्याने पहिल्या वनडेमध्ये अर्धशतक केलं होतं.  या मॅचमध्ये त्याने 114 बॉल खेळून 108 रन केले. राहुलच्या या खेळीमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. कर्णधार विराट कोहलीने 79 बॉलमध्ये 66 रन केले. राहुलला टॉम करनने आणि विराटला आदिल रशीदने आऊट केलं. श्रेयस अय्यरच्याऐवजी टीममध्ये आलेल्या ऋषभ पंतनेही वादळी खेळी केली. पंतने 192.50 च्या स्ट्राईक रेटने 40 बॉलमध्ये 77 रन काढले, पंतने त्याच्या या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 3 फोर लगावले. हार्दिकने 16 बॉलमध्येच 35 रन केले. हार्दिकने शेवटच्या काही ओव्हरमध्ये इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण करत 4 सिक्स आणि 1 फोर मारली. इंग्लंडकडून रीस टॉप्ले आणि टॉम करनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. तर सॅम करन आणि आदिल रशीदला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर (Jos Buttler) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. इयन मॉर्गनला (Eoin Morgan) दुखापत झाल्यामुळे या मॅचमध्ये बटलरला नेतृत्व देण्यात आलं आहे. तसंच सॅम बिलिंग्स यालाही मागच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे तोदेखील टीमबाहेर आहे. दुसरीकडे भारतीय टीममध्ये एक बदल करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरऐवजी (Shreyas Iyer) ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी देण्यात आली आहे. पहिल्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे अय्यर वनडे सीरिजमधून बाहेर झाला आहे. श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुसऱ्या वनडेमध्ये संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

First published:

Tags: India vs england, Rishabh pant, Shreyas iyer, Suryakumar yadav, Virat kohli