चेन्नई, 11 फेब्रुवारी : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतरही संजय मांजरेकर यांनी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाबत आपली निराशा बोलून दाखवली आहे. मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक केल्यानंतर रहाणेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रहाणेच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचं संजय मांजरेकर म्हणाले आहेत.
कॅप्टन रहाणेबाबत मला बॅट्समन रहाणे म्हणून आक्षेप आहे. मेलबर्नमधल्या शतकानंतर रहाणेचा स्कोअर 27*, 22, 4, 37, 24, 1 आणि 0 असा आहे. सर्वोत्तम खेळाडू त्यांचा फॉर्म पुढे घेऊन जातात आणि फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंवरचा दबाव कमी करतात, असं ट्विट संजय मांजरेकर यांनी केलं आहे.
My issue with Rahane the captain is Rahane the batsman. After that 100 in Melbourne his scores are - 27*, 22, 4, 37, 24, 1 & 0. After a 100, class players carry their form & carry the burden of players out of form. #INDvENG
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 9, 2021
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला, त्यामुळे रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. यानंतर लगेचच्याच मॅचमध्ये रहाणेने शतक झळकावलं आणि भारताला सामना जिंकवून दिला. एवढंच नाही तर रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजही 2-1 ने जिंकली. आता इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये विराटचं टीममध्ये पुनरागमन झाल्यामुळे त्याच्याकडे पुन्हा एकदा टीमची धुरा सोपावण्यात आली.
चेन्नई टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रहाणे अपयशी ठरला. पहिल्या इनिंगमध्ये जो रूटने स्लीपमध्ये रहाणेचा उत्कृष्ट कॅच घेतला, तर दुसऱ्या इनिंगमध्ये जेम्स अँडरसनच्या रिव्हर्स स्विंगवर रहाणे बोल्ड झाला. या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रहाणे 1 आणि ० रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajinkya rahane, Cricket, Sports, Tweet