मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : मांजरेकरांनी सांगितली रहाणेच्या बॅटिंगमधली सगळ्यात मोठी कमजोरी

IND vs ENG : मांजरेकरांनी सांगितली रहाणेच्या बॅटिंगमधली सगळ्यात मोठी कमजोरी

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) बॅटिंगवर नाराज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) रहाणेला संघर्ष करावा लागत आहे.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) बॅटिंगवर नाराज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) रहाणेला संघर्ष करावा लागत आहे.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) बॅटिंगवर नाराज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) रहाणेला संघर्ष करावा लागत आहे.

अहमदाबाद, 6 मार्च : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) बॅटिंगवर नाराज आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs England) रहाणेला संघर्ष करावा लागत आहे.  सध्या रहाणेची बॅटिंग ती सुरक्षा देत नाही, ज्याची अपेक्षा टीम करते, असं मांजरेकर म्हणाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रहाणे 27 रन करून आऊट झाला. रहाणेचा आत्मविश्वास सध्या कमी झाला आहे आणि त्या स्वत:ला असुरक्षित वाटत असल्याचं दिसत आहे. मागच्या काही काळापासून त्याच्या बॅटिंगमध्ये ही गडबड असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.

'इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये रहाणे आक्रमक विचार घेऊन बॅटिंगला उतरला होता. मागच्या तीन-चार वर्षांपासून तो याच प्रकारे बॅटिंग करत आहे. अनेक वेळा त्याने सगळे शॉट खेळले. पण या टेस्टमध्ये त्याने खेळलेल्या अनेक शॉट्समध्ये नियंत्रण दिसलं नाही. त्याने जलद 27 रन केले हे खरं आहे. पण ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खेळाडूंना त्याच्या या बॅटिंगमुळे आत्मविश्वास मिळाला नसेल,' अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना दिली.

रहाणे पहिल्या इनिंगमध्ये 45 बॉल खेळून 27 रनवर आऊट झाला. जेम्स अँडरसनने आऊट स्विंगवर रहाणेला दुसऱ्या स्लिपकरवी कॅच आऊट केलं. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न टेस्टमध्ये रहाणेने 112 रनची ऐतिहासिक खेळी केली, त्यामुळे भारताचा विजय झाला. पण यानंतर रहाणेची बॅट शांत आहे. त्या शतकानंतर रहाणेला मोठी खेळी करता आली नाही. मागच्या 11 इनिंगमध्ये त्याला फक्त एकदाच अर्धशतक करता आलं आहे. या कालावधीमध्ये त्याने 27*, 22, 4, 37, 24, 1, 0, 67, 10, 7 आणि 27 रनची खेळी केली.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही रहाणे अपयशी ठरला. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 1 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 0 रन केले. तेव्हाही मांजरेकरांनी रहाणेवर टीका केली होती. कर्णधार रहाणेसोबत माझी अडचण ही आहे, की बॅट्समन रहाणे चांगली कामगिरी करत नाही. मेलबर्नच्या शतकानंतर रहाणेचा स्कोअर 27*, 22, 4, 37, 24, 1 आणि 0. शतकानंतर मोठा खेळाडू आपला फॉर्म पुढे घेऊन जातो आणि टीममधल्या फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूचं ओझं उचलतो, असं ट्विट मांजरेकर यांनी केलं होतं.

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक हजार रन पूर्ण केल्या आहेत.

First published:

Tags: Ajinkya rahane, Cricket, India vs england, IPL 2021, Sports