IND vs ENG : फक्त दोन दिवसांमध्येच पराभव झाल्यानंतर एकमेकांशी भिडले इंग्लंडचे क्रिकेटपटू

IND vs ENG : फक्त दोन दिवसांमध्येच पराभव झाल्यानंतर एकमेकांशी भिडले इंग्लंडचे क्रिकेटपटू

भारताविरुद्धची अहमदाबाद टेस्ट फक्त दोनच दिवसात गमावल्यानंतर इंग्लंडचा (India vs England) क्रिकेटपटू रॉरी बर्न्सला (Rory Burns) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) फटकारलं आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 28 फेब्रुवारी : भारताविरुद्धची अहमदाबाद टेस्ट फक्त दोनच दिवसात गमावल्यानंतर इंग्लंडचा (India vs England) क्रिकेटपटू रॉरी बर्न्सला (Rory Burns) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) फटकारलं आहे. अहमदाबाद टेस्टच्या पराभवानंतर रॉरी बर्न्स इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलेक्सेंड्रा हार्टलेसोबत (Alexandra Hartley) ट्विटरवर भिडला होता. एलेक्सेंड्रा हार्टलेने अहमदाबाद टेस्टच्या पराभवानंतर पुरुष टीमला ट्रोल केलं होतं. बर्न्सला हे आवडलं नाही आणि त्याने सोशल मीडियावर तिला प्रत्युत्तर दिलं.

इंग्लंडच्या पराभवानंतर एलेक्सेंड्रा हार्टलेने ट्विट करून लिहिलं, 'इंग्लंडच्या पुरुष टीमचा चांगला प्रयत्न, आज रात्री इंग्लंडच्या महिला टीमची मॅच सुरू होण्याआधीच टेस्ट मॅच संपवली.' बर्न्सला हार्टलेचं ट्विट पटलं नाही. 'खूप निराशाजनक विचार. आम्ही नेहमीच महिला क्रिकेटला पाठिंबा दिला,' असं प्रत्युत्तर बर्न्सने दिलं. यानंतर काही वेळाने त्याने हे ट्विट हटवलं, पण जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांनी त्याचं हे ट्विट लाईक केलं होतं. बर्न्सच्या या ट्विटनंतर एलेक्सेंड्राला स्पष्टीकरण द्यावं लागलं. माझ्या ट्विटला चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं एलेक्सेंड्रा म्हणाली.

या ट्विटनंतर रॉरी बर्न्सला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुनावलं. बर्न्सला त्याच्या जबाबदाऱ्यांबाबत सांगण्यात आलं आहे, असं इसीबीच्या प्रवक्त्यांनी द गार्डियन या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. तसंच इंग्लंड टीमचे प्रमुख प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनीही हे प्रकरण आता सोडवण्यात आल्याचं सांगितलं.

रॉरी बर्न्सची खराब कामगिरी

रॉरी बर्न्सने भारत दौऱ्यात खराब कामगिरी केली आहे. बर्न्सने दोन टेस्टमध्ये 14.50 च्या सरासरीने फक्त 58 रन केले. चेन्नई टेस्टनंतरच बर्न्सला इंग्लंडने बाहेर बसवलं. ओपनिंग जोडी बदलून इंग्लंडला फारसा फायदा झाला नाही. अहमदाबादच्या टेस्टमध्ये टीमचा 10 विकेटने पराभव झाला.

Published by: Shreyas
First published: February 28, 2021, 5:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या