पुणे, 24 मार्च : कोरोना व्हायरसमुळे टीम इंडियाचे (Team India) खेळाडू बायो-बबलमध्ये आहेत. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची कोरोना टेस्टही केली जात आहे. ही टेस्ट करताना खेळाडूंना थोडा त्रासही होतो. रोहित शर्माचा (Rohit Sharma) असाच एक कोरोना टेस्ट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माची कोरोना टेस्ट सुरू असताना ऋषभ पंत (Rishabh Pant) तिकडे उभा होता, त्यावेळी पंतने रोहितला चिडवलं. यानंतर रोहितने पंतकडे बघून आक्षेपार्ह इशारा केला.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचआधी (India vs England) दोन्ही टीमच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यावेळी पंतने रोहितला त्रास द्यायला सुरूवात केली आणि याचा व्हिडिओ काढला. कोरोना टेस्ट सुरू असताना रोहितला दुखायला लागलं. यानंतर पंतने रोहितला कसा आहेस भावा? असं विचारलं. तेव्हा रोहितने पंतकडे बघून आक्षेपार्ह इशारा केला. पंतने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेयर केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bonding between Rohit Sharma and Rishabh Pant 😂#RohitSharma pic.twitter.com/bN02lu660c
— Adesh Ajju (@AjjuAdesh) March 24, 2021
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव केला. या मॅचमध्ये बॅटिंग करताना रोहित शर्मा मार्क वूडच्या (Mark Wood) बॉलिंगवर दुखापतग्रस्त झाला, यानंतर तो फिल्डिंगला आला नाही. आता दुसऱ्या वनडेमध्ये तो खेळणार का नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्यालाही दुखापत झाली आहे. फिल्डिंग करत असताना श्रेयसचा खांदा दुखावला. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर उरलेल्या दोन्ही मॅचमधून बाहेर झाला आहे. तसंच तो अर्धी आयपीएलही खेळू शकणार नाही, अशी माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rishabh pant, Rohit sharma