मुंबई, 1 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात टेस्ट सीरिज संपल्यानंतर टी-20 आणि वनडे मॅचची सीरिज होणार आहे. भारतीय निवड समितीने टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली आहे, पण आता वनडे सीरिजमध्ये भारताचे तीन प्रमुख खेळाडू खेळणार नसल्याचं वृत्त आहे. उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ऑल राऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना वनडे सीरिजमध्ये आराम दिला जाऊ शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 मार्चपासून वनडे सीरिजला सुरूवात होईल. या सगळ्या मॅच पुण्यात खेळल्या जातील. पुण्यात कोरोना व्हायरसचे वाढते आकडे लक्षात घेता सगळ्या मॅच प्रेक्षकांशिवायच खेळवल्या जाणार आहेत. पण आता चाहत्यांना रोहित शर्मा, ऋषभ पंत या विस्फोटक खेळाडूंची बॅटिंग टीव्हीवरही बघता येणार नाही.
रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरला आराम द्यायचं कारण म्हणजे ते मागच्या आयपीएलपासून लागोपाठ क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया सीरिज संपल्यानंतर हे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही सहभागी आहेत. एवढा काळ बायो बबलमध्ये राहणं मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजनंतर एप्रिल महिन्यात आयपीएललाही सुरूवात होणार आहे, त्यामुळेही या खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.