IND vs ENG : मैदानात झोपून रोहितचा पिचवर टीका करणाऱ्यांवर निशाणा!
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. अशातच टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
अहमदाबाद, 28 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली. या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत. अशातच टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
इन्स्टाग्रामवर रोहित शर्माने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रोहित मैदानात झोपलेला दिसत आहे. चौथ्या टेस्टसाठीची खेळपट्टी कशी असेल, याचा विचार करतोय, असं कॅप्शन रोहितने या फोटोला दिलं आहे.
तिसऱ्या टेस्टमध्ये अनेक खेळाडू स्पिनरच्या सरळ बॉलवर आऊट झाले. अक्षर पटेलने या दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी 5-5 विकेट घेत मॅचमध्ये एकूण 11 विकेट घेतल्या. तसंच इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानेही 5 विकेट घेण्यात यश मिळवलं.
रोहित शर्माने या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये मॅचचा सर्वाधिक स्कोअर 66 रन केले.
तिसऱ्या टेस्टमधल्या या विजयासोबतच टीम इंडियाने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. या पराभवासोबतच इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे.
अहमदाबादच्या या खेळपट्टीवर रन करण्यासाठी खेळाडूंनी जिगर दाखवणं गरजेचं आहे, तुम्ही फक्त बचावात्मक खेळू शकत नाही. कारण खेळपट्टीवर काही बॉल स्पिन होतात, तर काही सरळ राहतात, असं रोहित शर्मा म्हणाला. सीरिजच्या चौथ्या टेस्ट मॅचला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे.