मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ICC चा आणखी एक वादग्रस्त नियम; टीम इंडियाला महागात पडला

IND vs ENG : ICC चा आणखी एक वादग्रस्त नियम; टीम इंडियाला महागात पडला

डीआरएसचा अंपायर्स कॉल आणि सॉफ्ट सिग्नल याच्यावरून भारत-इंग्लंड (India vs England) सीरिजमध्ये वाद झाले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने या नियमांवरून टीका केली, तसंच हे नियम बदलण्याचीही मागणी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये आयसीसीच्या (ICC) आणखी एका नियमावरून वाद पाहायला मिळाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 26 मार्च : डीआरएसचा अंपायर्स कॉल आणि सॉफ्ट सिग्नल याच्यावरून भारत-इंग्लंड (India vs England) सीरिजमध्ये वाद झाले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने या नियमांवरून टीका केली, तसंच हे नियम बदलण्याचीही मागणी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये आयसीसीच्या (ICC) आणखी एका नियमावरून वाद पाहायला मिळाला. भारताची बॅटिंग सुरू असताना 40 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ऋषभ पंत (Rishabh Pant) रिव्हर्स स्कूप खेळला. बॉल बॅटच्या आतल्या बाजूला लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला, पण टॉम करनने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी पंतला आऊट दिलं. यानंतर पंतने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये बॉल बॅटला लागल्याचं स्पष्ट दिसल्यानंतर थर्ड अंपायरने पंतला नॉट आऊट दिलं, पण त्याला चार रन देण्यात आल्या नाहीत.

आयसीसीच्या नियमांनुसार अंपायरने जर खेळाडूला आऊट दिलं तर बॉल डेड होतो, त्यामुळे त्या बॉलवर मिळालेल्या रन मान्य केल्या जात नाहीत. मॅचमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या या नियमांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा यानेही या नियमावर टीका केली. 'अंपायरच्या चुकीमुळे ऋषभ पंतला 4 रन मिळाल्या नाहीत. या गोष्टी कोट्यवधी वेळा झाल्या आहेत. वर्ल्ड कप फायनलमध्ये एखाद्या टीमसोबत असं झालं आणि विजयासाठी 2 रन बनवण्याची गरज असेल तर... विचार करा,' असं ट्वीट आकाश चोप्राने केलं.

विराटची टीका

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सीरिजमध्ये आयसीसीच्या दोन नियमांवरून बराच वाद झाला. डीआरएसशी जोडला गेलेला अंपायर्स कॉल (DRS Umpires Call) आणि सॉफ्ट सिग्नलवरून (Soft Signal) विराट कोहलीने (Virat Kohli) उघडपणे संताप व्यक्त करत या नियमांवर टीका केली होती.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या टी-20 मध्ये डेव्हिड मलानने (David Malan) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) कॅच पकडला. मैदानातल्या अंपायरनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवताना सॉफ्ट सिग्नल आऊट दिला. थर्ड अंपायरला मलानने कॅच नीट पकडला का नाही, याबाबत स्पष्ट दिसलं नाही, पण सॉफ्ट सिग्नल आऊट असल्यामुळे सूर्यकुमार यादवला आऊट देण्यात आलं.

सॉफ्ट सिग्नलच्या या मुद्द्यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला. तर माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रानेही यावर टीका केली. अंपायर 70 मीटर लांब पकडल्या गेलेल्या कॅचबाबत सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतो? असा सवाल आकाश चोप्राने उपस्थित केला.

First published:

Tags: Icc, India vs england, Rishabh pant