डरहम, 20 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजआधी (India vs England) भारतीय टीम डरहममध्ये 3 दिवसीय सराव सामना (Practice Match) खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहे, कारण विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यातून माघार घेतली आहे. या सराव सामन्यात टीम इंडियाचे दोन खेळाडू विरोधी टीमकडून खेळत आहेत. काऊंटी इलेव्हन टीममध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना संधी मिळाली आहे. भारतीय टीममध्ये या दोघांना संधी मिळाली नसली, तरी त्यांना पूर्ण मॅच प्रॅक्टीस मिळणार आहेत.
काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या मॅचमधून कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि आर.अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय टीममध्ये रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, अक्षर पटेल आणि उमेश यादव आहेत, तर केएल राहुल विकेट कीपिंग करत आहे.
सराव सामन्यासाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
रोहित शर्मा फ्लॉप
काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. 33 बॉलमध्ये 9 रन करून तो आऊट झाला. तर मयंक अग्रवाललाही (Mayank Agarwal) अपयश आलं. 35 बॉलमध्ये 28 रन करून मयंक माघारी परतला. त्याने आपल्या इनिंगमध्ये 6 उत्कृष्ट फोर मारल्या, पण त्याला पुढे जाता आलं नाही. आज मोठी खेळी करता आली असती, तर पहिल्या टेस्टआधी मयंकचा आत्मविश्वास वाढला असता.
4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाल्यामुळे मयंक रोहितसोबत ओपनिंगला खेळेल. तर केएल राहुलला (KL Rahul) मधल्या फळीत खेळवण्याचा टीमचा विचार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england