...म्हणून शिखर धवनसाठी ही कसोटी ठरू शकते शेवटची

क्रिकेट तज्ज्ञांनी पृथ्वी शॉला मूळ संघात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 03:44 PM IST

...म्हणून शिखर धवनसाठी ही कसोटी ठरू शकते शेवटची

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका हरल्यानंतर भारतीय संघ आता शेवटचा सामनाही हरण्याची चिन्ह दिसत आहेत. मालिका हरण्यासोबतच एका भारतीय क्रिकेटरचं कसोटी क्रिकेटमधलं करिअर संपुष्टात येण्याबद्दलच्या चर्चा सुरू आहे.

भारतीय संघाला फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागला. सलामीवीर मुरली विजय, केएल राहुल आणि शिखर धवन या तिघांनाही उत्तम कामगिरी करता आली नाही.

सर्वात जास्त निराशा शिखर धवनने केली. त्यामुळेच असे म्हटले जाते की, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर शिखर धवनला पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.

शिखरने आठ सामन्यांत २०.२५ च्या सरासरीने फक्त १६२ धावा केल्या. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघाला कोणत्याच सामन्यात चांगली सुरूवात करता आली नाही.

शिखर धवनच्याआधी त्याचा जोडीदार मुरली विजयही इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरला होता. या दौऱ्यानंतर त्यालाही कसोटी संघापासून लांब ठेवण्यात आले.

Loading...

मुरलीच्या जागी मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आले. मात्र कर्णधार विराट कोहलीने पाचव्या कसोटी सामन्यात ११ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करुन घेतला नाही.

क्रिकेट तज्ज्ञांनी पृथ्वी शॉला मूळ संघात न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. आता शिखर धवनच्या खराब फॉर्ममुळे विराटच्या शिखरला संघात कायम ठेवण्याच्या निर्णयावर सारेच नाराज झालेले दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...