मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Ind vs Eng : इंग्लंडसाठी वनडेमध्ये ‘धोकादायक’ ठरेल हा भारतीय फास्ट बॉलर!

Ind vs Eng : इंग्लंडसाठी वनडेमध्ये ‘धोकादायक’ ठरेल हा भारतीय फास्ट बॉलर!

इंग्लंडविरुद्ध (England) लवकरच तीन वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीम जाहीर झाली असून त्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) या दोन खेळाडूंनी भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं आहे.

इंग्लंडविरुद्ध (England) लवकरच तीन वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीम जाहीर झाली असून त्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) या दोन खेळाडूंनी भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं आहे.

इंग्लंडविरुद्ध (England) लवकरच तीन वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीम जाहीर झाली असून त्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) या दोन खेळाडूंनी भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं आहे.

पुढे वाचा ...

  अहमदाबाद, 20 मार्च : एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टीममधून खेळायला मिळणं हे त्याचं जीवनातलं महत्त्वाचं ध्येय असतं. जरीही क्रिकेटमध्ये ही संधी मिळणं अवघड असलं तरीही क्रिकेटपटू यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करतो. उत्तम कामगिरी केली तर संधी मिळते हे एका 25 वर्षांच्या खेळाडूने आता दाखवून दिलंय. इंग्लंडविरुद्ध (England) लवकरच तीन वनडे मॅचची सीरिज सुरू होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीम जाहीर झाली असून त्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) या दोन खेळाडूंनी भारतीय टीममध्ये स्थान मिळवलं आहे. सूर्यकुमार यादवच्या कामगिरीमुळे त्याला वन-डे टीममध्ये स्थान मिळेल असा अंदाज वर्तवला जात होताच, पण कृष्णाचं नाव जाहीर झाल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण दिग्गज खेळाडू असलेल्या या भारतीय टीममध्ये नवोदित फास्ट बॉलर कृष्णाला का निवडलं? हा प्रश्न सर्वांनाच पडला. कर्नाटकच्या प्रसिद्ध कृष्णाची टीममध्ये निवड का झाली आणि तो इंग्लंडच्या खेळाडूंना कसा धोकादायक ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

  खरं तर पी. कृष्णाने लिस्ट ए करियरमध्ये फक्त 48 मॅच आतापर्यंत खेळल्या आहेत. त्यामुळे तो खूप अनुभवी आहे असं नाही, पण आपल्या बॉलिंगच्या जोरावर त्याने जी कामगिरी केली आहे ती दणकट आहे, त्यामुळेच त्याने निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. कृष्णानी 48 लिस्ट ए सामन्यांमध्ये 5.17 च्या इकॉनॉमी रेटनी 81 विकेट घेतल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने केवळ 9 सामने खेळत  34 तर टी-20 च्या 40 सामन्यांत 33 बळी घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत त्यानी 14 विकेट घेतल्या आहेत.

  बांगलादेश ए विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी

  2015 मध्ये बांगलादेश ए (Bangladesh A) भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी कर्नाटकविरुद्ध बांगलादेश ए वन-डे सामन्यात कृष्णाने 49 रनमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानी पहिल्या चेंडूवर रॉनी तालुकदारला बाद केलं. त्यानंतर त्याने बांगलादेशच्या अनामुल हक, सौम्या सरकार आणि नासीर हुसेन यांच्या विकेट्सही घेतल्या होत्या. कर्नाटकने (Karnataka) हा सामना चार गडी राखून जिंकला होता. त्या कामगिरीमुळे प्रसिद्ध कृष्णा सर्वांच्याच नजरेत आला. प्रसिद्धनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये 25 फेब्रुवारी 2017 ला विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यातून पदार्पण केलं त्यानंतर त्याने सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत 21 जानेवारी 2018 ला टी-20 मध्ये पदार्पण केलं. 2018-19 मध्ये विजय हजारे चषकात त्याने 7 सामन्यांत 13 बळी घेतले आणि तो त्या स्पर्धेत कर्नाटकचा सर्वाधिक बळी घेणारा बॉलर ठरला. ऑगस्ट 2018 मध्ये कृष्णाची निवड भारत ए साठी झाली.

  आयपीएलमध्येही दाखवलाय जलवा

  पी. कृष्णाने आयपीएलमध्येही (IPL) आपल्या वेगवान बॉलिंगचा जलवा दाखवला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने 24 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. त्याला 2018 मध्ये 7 सामान्यांत 10 आणि 2019 मध्ये 11 सामन्यांत 4 विकेट मिळाल्या. गेल्यावर्षी दुबईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्यानी 6 सामन्यांत 4 विकेट घेतल्या होत्या. या वर्षीच्या आयपीएलच्या 14 व्या मोसमात कृष्णा कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळताना दिसेल.

  स्थानिक उत्तम कामगिरी करत भारतीय टीममध्ये स्थान मिळवणाऱ्या कृष्णाला वन-डे सीरिजमध्ये आपलं कौशल्य सिद्ध करून दाखवायला लागेल. ते त्यानी केलं तर सध्या भारतीय टीमला आवश्यक असलेल्या वेगवान बॉलरच्या जागेवर तो दावा करू शकेल.

  First published:
  top videos

   Tags: Bangladesh cricket team, Cricket news, India vs england, Karnataka, KKR, Sports, Suryakumar yadav