मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराट अनुभवी खेळाडूंना बाहेर ठेवणार, यांना Playing XI मध्ये संधी!

IND vs ENG : विराट अनुभवी खेळाडूंना बाहेर ठेवणार, यांना Playing XI मध्ये संधी!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) या सीरिजमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) या सीरिजमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) या सीरिजमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जुलै: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या पराभवानंतर विराट कोहली (Virat Kohli) या सीरिजमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे, यात काही अनुभवी खेळाडूंना बाहेर बसवलं जाऊ शकतं. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संधी दिली जाऊ शकते.

इंग्लंडमधल्या स्विंग बॉलिंगला मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) सिराजला बाहेर ठेवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. फायनलमध्ये भारताने जडेजा (Ravindra Jadeja) आणि अश्विन (R Ashwin) या दोन स्पिनरना मैदानात उतरवलं आणि इशांत शर्माचा (Ishant Sharma) अनुभव पाहता त्याला संधी दिली गेली. पहिल्या इनिंगमध्ये इशांतने तीन विकेट घेतल्या, पण अनेकांनी साऊथम्पटनच्या खेळपट्टीवर सिराज अधिक धोकादायक ठरला असता, असं मत मांडलं.

भारताच्या फास्ट बॉलरना न्यूझीलंडच्या खालच्या फळीतील बॅट्समनना लवकर आऊट करता आलं नाही, त्यामुळे किवी टीमने पहिल्या इनिंगमध्ये महत्त्वाची आघाडी घेतली. चौथ्या इनिंगमध्ये 139 रनच्या आव्हानाचा पाठलाग किवी टीमने अगदी सहज केला. न्यूझीलंडच्या बॅटिंगसमोर भारताची फास्ट बॉलिंग निष्प्रभ ठरली. टीम इंडियाच्या तिन्ही फास्ट बॉलरना एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे न्यूझीलंडचा फायनलमध्ये विजय झाला.

सिराजने आपल्या टेस्ट करियरची सुरुवात चांगली केली. ऑस्ट्रेलियात 3 टेस्ट मॅचमध्ये त्याने 13 विकेट घेतल्या. शमी, बुमराह, इशांत आणि उमेश यादव हे फास्ट बॉलर नसताना सिराजने भारताच्या बॉलिंगचं नेतृत्व केलं. ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये तो भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. भारताने ही सीरिज 2-1 ने जिंकली. सिराजने 5 टेस्टमध्ये 28.25 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अश्विन आणि जडेजाची एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे, पण जर असं झालं तर इशांत किंवा बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यापैकी एकाला बाहेर बसवून सिराजला संधी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इशांतलाच बाहेर बसावं लागेल.

याशिवाय टीम इंडिया मधल्या फळीतही बदल करण्याच्या विचारात आहे. ओपनर असलेल्या केएल राहुलला (KL Rahul) चौथ्या क्रमांकावर पाठवून कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. जर असं झालं तर अनुभवी चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) बाहेर बसावं लागू शकतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पुजाराच्या संथ खेळीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याशिवाय विराट कोहलीनेही खेळाडूंना रन काढण्यासाठी धोका पत्करावा लागेल, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पुजारावर निशाणा साधला होता.

2018 सालच्या इंग्लंड दौऱ्यातही भारताने पुजाराला एका सामन्यासाठी डच्चू दिला होता, पण ही रणनिती विराट कोहलीवर उलटली, अखेर पुढच्या सामन्यापासून पुजारा पुन्हा टीममध्ये आला.

First published:

Tags: India vs england, Team india, Virat kohli