अहमदाबाद, 19 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 रनने रोमांचक विजय झाला. यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) विराट कोहलीला (Virat Kohli) ट्रोल केलं. कोहलीने शेवटच्या काही ओव्हरमध्ये रोहितला कॅप्टन्सी देणं शानदार होतं, रोहितची रणनीती कामाला आली, असं ट्विट मायकल वॉनने केलं. चौथ्या टी-20 मध्ये बॉलिंगवेळी शेवटच्या काही ओव्हरमध्ये विराटला दुखापत झाली, त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. विराटच्या गैरहजेरीत रोहित शर्माने (Rohit Sharma) टीमचं नेतृत्व केलं आणि हरलेल्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला.
रोहितने इंग्लंडच्या बॅटिंगवेळी 17वी ओव्हर शार्दुल ठाकूरला दिी. या ओव्हरआधी शार्दुलला एकही विकेट मिळाली नव्हती, त्यामुळे रोहितने शार्दुलला काहीतरी समजावलं आणि यानंतर लगेच लागोपाठ दोन बॉलवर त्याने बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गनची विकेट घेतली. या डबल धक्क्यातून इंग्लंडची टीम सावरली नाही आणि अखेर भारताचा 8 रनने विजय झाला.
कर्णधार कोहलीवर निशाणा साधताना वॉनने पुन्हा एकदा भारतीय टीमची मुंबई इंडियन्सशी तुलना केली, पण वॉनच्या या ट्वीटवर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) निशाणा साधला. वॉनने ट्वीट करत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचं नाव घेत, त्यांनी प्रभावित केल्याचं म्हणलं. 'सूर्यकुमार यादव, मुंबई इंडियन, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन, कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन, सहज डोक्यात विचार आला,' असं वॉन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. हे तिन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात, या तिघांच्या कामगिरीमुळे भारताचा या मॅचमध्ये विजय मिळवता आला.
Great captaincy from Virat ... !! Allowing @ImRo45 to get involved & clearly his tactics work ... #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 18, 2021
Just a thought ... @surya_14kumar Mumbai Indian ... @hardikpandya7 Mumbai Indian ... @ImRo45 captaincy Mumbai Indian !!!! @mipaltan #JustSaying #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 18, 2021
मायकल वॉनच्या या ट्वीटला वसीम जाफरने प्रत्युत्तर दिलं. तुमच्या टीमला जर एखाद्या राष्ट्रीय टीमने नाही, तर फ्रॅन्चायजीच्या टीमने हरवलं, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही विरोधी टीमला नाही, तर स्वत:च्याच टीमला ट्रोल करत आहात, असं वसीम जाफर म्हणाला.
When you say your team wasn't defeated by a national team but by a franchise team, you're not trolling your opponents, you're trolling your own team. Night all. #INDvsENG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 18, 2021
याआधी दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तेव्हाही मायकल वॉनने भारतीय टीमला ट्रोल केलं होतं. त्या मॅचमध्ये वॉनने विजयाचं श्रेय इशान किशनला दिलं. इंग्लंडला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला, असं मायकल वॉन म्हणाला होता. आयपीएलची सगळ्यात यशस्वी पाचवेळा ट्रॉफी जिंकलेली मुंबई इंडियन्स भारतीय टीमपेक्षा भारी असल्याचं मत वॉनने मांडलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma, Virat kohli