मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : लॉर्ड्सच्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप, जो रूट कॅप्टन्सी सोडणार!

IND vs ENG : लॉर्ड्सच्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप, जो रूट कॅप्टन्सी सोडणार!

जो रूट देणार कर्णधारपदाचा राजीनामा?

जो रूट देणार कर्णधारपदाचा राजीनामा?

लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय बॉलर्सच्या भेदक आक्रमणासमोर इंग्लंडची (India vs England Lords Test) बॅटिंग गडगडली. लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने इंग्लंड क्रिकेटमध्ये भुकंपाचे संकेत दिले आहेत.

पुढे वाचा ...

लंडन, 17 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय बॉलर्सच्या भेदक आक्रमणासमोर इंग्लंडची (India vs England Lords Test) बॅटिंग गडगडली. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 120 रनवर ऑल आऊट झाला. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांनी खेळपट्टीवर अक्षरश: आग ओकली, त्यामुळे भारताने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.

लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने इंग्लंड क्रिकेटमध्ये भुकंपाचे संकेत दिले आहेत. जो रूट (Joe Root) इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व सोडू शकतो, असं मायकल वॉन म्हणाला आहे.

मायकल वॉनने टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या आपल्या स्तंभात जो रूट आणि जेम्स अंडरसनबाबत (James Anderson) मोठं वक्तव्य केलं आहे. 'मला जो रूटची चिंता सतावत आहे. आता वेळ आली आहे का? याचा विचार तो करत असेल. जर त्याने फक्त 20 टेस्टमध्ये टीमचं नेतृत्व केलं असतं तर त्याच्यासाठी पुनरागमन सोपं होतं, पण 54 टेस्टमध्ये कॅप्टन्सी केल्यानंतर असं होत असेल, तर पुनरागमन कठीण असतं,' असं वॉन म्हणाला.

वरिष्ठ खेळाडूंनी समजावलं का नाही?

'जो रूट थकलेला असेल. आपण मोठ्या चुका केल्या हे त्याला माहिती आहे आणि आता तो स्वत:वरच संशय घेत असेल. एक कर्णधार आपण चुका केल्याचं मान्य करतो, पण वरिष्ठ खेळाडूंनी या चुका सुधारण्यासाठी काहीच केलं नाही, ही चिंतेची गोष्ट आहे. एक कर्णधार म्हणून मला वाटतं, लोकांनी माझ्याकडे यावं आणि चूक कुठे होत आहे, हे मला सांगावं. वरिष्ठ खेळाडू कुठे आहेत,' असं वॉनने लिहिलं.

मायकल वॉनने जो रूटला कर्णधारपदावर कायम राहण्याचा सल्ला दिला आहे. 'त्याने कर्णधारपद सोडू नये. त्याच्यासाठी पुनरागमन सोपं असणार नाही, पण त्याच्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही. रूटच्या टीमने आता भारताविरुद्धची सीरिज जिंकावी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात ऍशेसवर कब्जा करावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे,' असं मायकल वॉन म्हणाला. इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने (Ben Stokes) मानसिक कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे वर्षभर खेळणार नाही. स्टुअर्ट ब्रॉडलाही (Stuart Broad) दुखापतीने ग्रासलं आहे.

First published:

Tags: India vs england, Joe root