अहमदाबाद, 16 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजच्या (India vs England) पहिल्या मॅचमध्ये 1 रन आणि त्यानंतर दोन्ही सामन्यानत 0 आणि 0. हा स्कोअर आहे टीम इंडियाच्या त्या बॅट्समनचा ज्याने मागच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये रनचा पाऊस पाडला होता. केएल राहुल (KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तिन्ही टी-20 मध्ये सुपर फ्लॉप राहिला. सीरिजच्या तिन्ही मॅचमध्ये मिळून राहुलला फक्त 1 रन करता आली आहे. तर मागच्या 4 टी-20 इनिंगमध्ये राहुलला खातंही उघडता आलं नाही. राहुलकडून वारंवार होणाऱ्या चुकांमुळे आता माजी क्रिकेटपटू त्याच्या बॅटिंग तंत्रात चुका शोधत आहेत.
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना म्हणाला, 'राहुल वारंवार चुका करत आहे. त्याचे पाय हलत नाहीत आणि त्याच्या बॅट-पॅडमध्ये खूप जास्त गॅप दिसत आहे. राहुल मागच्या तीन इनिंगमध्ये दोनवेळा बोल्ड झाला, त्याला आऊट स्विंग बॉलिंगवर अडचणींचा सामना करावा लागत आहे.'
केएल राहुलला पहिल्या दोन टी-20 मॅचमध्ये अपयशी ठरल्यानंतरही त्याला तिसऱ्या मॅचमध्ये संधी देण्यात आली. रोहित शर्माचं (Rohit Sharma) टीममध्ये पुनरागमन झालं, त्यामुळे सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) बाहेर बसावं लागलं. दुसऱ्या टी-20 मधून सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये सूर्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही, तरीही त्याला या सामन्यात संधी मिळाली नाही.
विराट कोहली वगळता इतर कोणत्याही भारतीय बॅट्समनना मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. 46 बॉलमध्ये 77 रनवर विराट नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर ऋषभ पंतने 20 बॉलमध्ये 25, हार्दिक पांड्याने 15 बॉलमध्ये 17 रन केले. भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 156 रन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, Kl rahul, Rohit sharma, Virat kohli