अहमदाबाद, 13 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये (India vs England) केएल राहुल (KL Rahul) बॅटने फार कमाल दाखवू शकला नाही. पण त्याने फिल्डिंगमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राहुलने बाऊंड्री लाईनवर हवेत उडी मारत टीमसाठी सिक्स वाचवला. भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसोबतच चाहत्यांनीही राहुलच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं. सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या बॅटिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल (Axar Patel) बॉलिंग करत होता आणि स्ट्राईकवर जॉस बटलर (Jos Buttler) होता. अक्षरने टाकलेल्या बॉलवर बटलरने पुढे येऊन लॉन्ग ऑफच्या दिशेने हवेत शॉट मारला. तिकडे केएल राहुल फिल्डिंगला उभा होता. बॉल समोर येताच राहुलने हवेत उडी मारली आणि कॅच पकडला. पण आपण बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात असल्याचं दिसताच त्याने बॉल हातातून सोडला. बटलरने यामध्ये फक्त दोनच रन काढल्या. राहुलचा हा अफलातून प्रयत्न बघून विराट कोहलीसह (Virat Kohli) टीम इंडियाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून राहुलचं कौतुक केलं.
I love KL Rahul pic.twitter.com/BhELnYZ7Z8
— Dreams in melancholy. (@Descndingbatman) March 12, 2021
फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी राहुल बॅटिंगमध्ये अपयशी ठरला. शिखर धवनसोबत बॅटिंगला आलेल्या राहुलला फक्त 1 रन करता आी. जोफ्रा आर्चरने राहुलला बोल्ड केलं. पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 124 रनच करता आल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 15.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून केला. आता सीरिजची दुसरी मॅच रविवारी अहमदाबादमध्येच होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Axar patel, Cricket news, India vs england, Kl rahul, Sports, T20 cricket, Virat kohli