Home /News /sport /

IND vs ENG : टी-20 सीरिजमध्ये संघर्ष, टीम इंडियामधल्या स्थानावर केएल राहुल म्हणतो...

IND vs ENG : टी-20 सीरिजमध्ये संघर्ष, टीम इंडियामधल्या स्थानावर केएल राहुल म्हणतो...

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England) केएल राहुल (KL Rahul) अपयशी ठरला. पहिल्या चार सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर राहुलला शेवटच्या मॅचमधून डच्चू देण्यात आला.

    पुणे, 25 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये (India vs England) केएल राहुल (KL Rahul) अपयशी ठरला. पहिल्या चार सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर राहुलला शेवटच्या मॅचमधून डच्चू देण्यात आला. चार मॅचपैकी दोन सामन्यात राहुल शून्यवर तर एकवेळा फक्त 1 रन करून आऊट झाला. टी-20 सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या केएल राहुलने वनडे सीरिजच्या पहिल्या सामन्यात मात्र अर्धशतकी खेळी केली. यानंतर त्याने आपल्या खराब फॉर्मवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तीन महिन्यांमध्ये प्रतिस्पर्धी मॅच न खेळल्यामुळे मी सुस्त झालो होतो, असं राहुल म्हणाला. 'मॅच खेळत असतो तेव्हा मी चांगल्या लयीत असतो. जेवढा क्रीजवर जास्त वेळ घालवायला पाहिजे होता, तितका वेळ मला मिळाला नाही. तुम्ही सराव करा किंवा नेटमध्ये वेळ घालवा, तुम्हाला चांगल्यापद्धतीने तयार राहायचा मार्ग शोधावा लागतो. मी माझ्या परीने सर्वोत्तम तयारी केली होती, पण मॅच खेळताना जो वेळ मिळतो, त्याला कशाचीच तोड नाही,' अशी प्रतिक्रिया राहुलने दिली. ऋषभ पंतचं (Rishabh Pant) मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तसंच इशान किशननेही (Ishan Kishan) मिळालेल्या संधीचं सोनं केलं, त्यामुळे टीम इंडियातलं माझं स्थान मी पक्कं मानू शकत नाही, अशी कबुली राहुलने दिली. 'जेव्हा तुम्ही या भारतीय टीमचा भाग असता तेव्हा स्पर्धा खूप असते, हे तुम्हाला माहिती असतं. तुमचं टीममधलं स्थान कधीच पक्कं नसतं. कायमच आव्हानाचा सामना करावा लागतो,' असं राहुलने सांगितलं. 'भारतामध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही, त्यामुळे तुम्हाला कायमच तुमच्या खेळावर काम करावं लागतं. ज्या संधी मिळतात, त्याचं सोनं करावं लागतं. खराब फॉर्म खेळाडूच्या करियरचा भाग आहे, त्यामुळे मला याची काहीच अडचण नाही. तसंच मी तणावही घेतला नाही,' असं राहुल म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Kl rahul

    पुढील बातम्या