IND vs ENG : आई-वडिलांच्या अश्रूंचं इशान किशनने पहिल्याच सामन्यात चीज केलं!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून (India vs England) इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इशान किशनने धमाकेदार सुरूवात केली.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून (India vs England) इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इशान किशनने धमाकेदार सुरूवात केली.

  • Share this:
    अहमदाबाद, 14 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून (India vs England) इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इशान किशनने धमाकेदार सुरूवात केली. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या इशान किशनने 32 बॉलमध्ये 56 रन केले. 175 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत इशानने 5 फोर आणि 4 सिक्स मारले. इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी पहिल्यांदाच बिहारच्या इशान किशन (Ishan Kishan) ला संधी देण्यात आली. मुलाची भारतीय टीममध्ये निवड झाल्याचं कळताच इशान किशनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. इशान किशनची भारतीय टीममध्ये निवड झाल्याची बातमी त्याच्या वहिनीला सगळ्यात पहिले कळाली. बीसीसीआच्या अधिकृत वेबसाईटवरून त्यांना ही माहिती मिळाली, यानंतर इशानच्या वहिनीने त्याच्या आई-वडिलांना हे दाखवलं, पण त्यांना ही गोष्ट समजली नाही. यानंतर इशान किशनने घरी फोन केला, तेव्हा त्याची आई सुचित्रा सिंह यांनी फोन उचलला. इशानने आपली टीम इंडियामध्ये निवड झाल्याचं सांगितल्यावर त्याची आई आणि वडील प्रणव पांडे ढसाढसा रडायला लागली. 'लहानपणापासूनच त्याचं स्वप्न भारतासाठी खेळायचं होतं. आता हे स्वप्न अखेर पूर्ण होईल. यासाठी त्याने खूप मेहनत केली होती. इशान नववीमध्ये होता, तेव्हा त्याची परीक्षा होती आणि मॅचही होती. परीक्षेला बसलं नाही, तर शाळेतून काढू असं शिक्षकांनी सांगितलं होतं. पण मी मुलाला साथ दिली आणि तो मॅच खेळला. आईला मात्र मुलगा कमीतकमी मॅट्रिक तरी व्हावा, असं वाटत होतं,' असं त्याचे वडील म्हणाले. जोपर्यंत इशान आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत नाही, तोपर्यंत आपण स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार नसल्याचं त्याच्या आईने सांगितलं. इशान किशन सध्या झारखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो, तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आहे. मागच्या आयपीएलमध्ये इशान किशनने धमाकेदार कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्सचा तो सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकवण्यात इशान किशनने मोलाची भूमिका बजावली होती.
    Published by:Shreyas
    First published: