डरहम, 20 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीमसाठी (India vs England) धोक्याची घंटा वाजली आहे. भारतीय टीमची टॉप ऑर्डर अजिबात फॉर्ममध्ये नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर (WTC Final) टीम इंडियाचे टॉप-3 बॅट्समन सराव सामन्यातही (Practice Match) अपयशी ठरले. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम डरहममध्ये सराव सामना खेळत आहे. काऊंटी सिलेक्ट इलेव्हनच्या (County Select XI) बॉलिंगसमोर रोहित शर्मा (Rohit Sharma), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)लवकर आऊट झाले. पुजाराने तर या सामन्यात विकेट गमावल्यानंतर स्वत:चं हसं करून घेतलं.
काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), आर.अश्विन (R Ashwin) यांच्यासारख्या दिग्गजांना आराम दिला. रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. रोहितने सुरुवातीला सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण 9 रन करून तो आऊट झाला.
Brilliant from @TrentBridge's Lyndon James who picks up his second. Agarwal bowled for 28 Live Stream ➡️ https://t.co/ZoY9QkxDQk#CountyXIvIndia @CountyChamp pic.twitter.com/PWOlck8Y5o
— Durham Cricket (@DurhamCricket) July 20, 2021
सुरुवातीला मयंक अग्रवाल रंगात दिसला, त्याने 6 फोरच्या मदतीने 28 रन केले, पण खराब शॉट मारून तो आऊट झाला. लिंडन जेम्सच्या इन स्विंग बॉलवर मयंक ड्राईव्ह मारायला गेला, पण त्याची बॅट आणि पॅडमध्ये अंतर होतं, यातून बॉल स्टम्पला जाऊन लागला आणि तो बोल्ड झाला. यानंतर चेतेश्वर पुजारानेही सेट झाल्यानंतर विकेट गमावली. 47 बॉलमध्ये 21 रन करून पुजारा स्टम्पिंग झाला. ऑफ स्पिनर जॅक कार्सनच्या बॉलिंगवर पुजारा क्रिज सोडून खेळायला गेला, पण बॉल बॅटला न लागता विकेट कीपरच्या हातात गेला आणि त्याने पुजाराला स्टम्पिंग केलं. हनुमा विहारीही 24 रन करून आऊट झाला.
Carson x Rew, Pujara gone. @SussexCCC @SomersetCCC Live Stream ➡️ https://t.co/JeTNRWzv2g pic.twitter.com/aB1jPQLNTT
— Durham Cricket (@DurhamCricket) July 20, 2021
या सराव सामन्यात भारताचा राखीव फास्ट बॉलर आवेश खान आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर यांना काऊंटी सिलेक्ट इलेव्हनकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. दोन्ही टीमच्या सहमतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 1987 साली पाकिस्तानच्या भारत दौऱ्यात 14 वर्षांचा सचिन तेंडुलकर ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताविरुद्ध इम्रान खानच्या टीममधून राखीव फिल्डर म्हणून खेळला होता.
इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) या दोन फास्ट बॉलरनाही आराम देण्यात आला आहे. भारतीय टीम 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आयसोलेशनमध्ये असल्यामुळे केएल राहुल याला विकेट कीपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून केएल राहुलला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी आपण तयार असल्याचं दाखवून द्यायची संधी आहे. टेस्ट सीरिजमध्ये राहुलला मधल्या फळीत खेळवण्याचा टीमचा विचार आहे.
सराव सामन्यासाठी भारतीय टीम
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england