Home /News /sport /

IND vs ENG : या दोघांनी गमावला विराटचा विश्वास! नव्या खेळाडूचा शोध सुरू

IND vs ENG : या दोघांनी गमावला विराटचा विश्वास! नव्या खेळाडूचा शोध सुरू

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या सत्राची सुरुवात 4 ऑगस्टपासून करणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

    मुंबई, 4 जुलै : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) नव्या सत्राची सुरुवात 4 ऑगस्टपासून करणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे, पण या सीरिजआधी टीमला मोठा धक्का लागला आहे. ओपनर शुभमन गिलला (Shubhaman Gill) दुखापत झाली आहे, त्यामुळे टीमने ओपनर म्हणून पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) मागणी केली आहे. पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) त्याने 800 पेक्षा अधिक रन केले आणि मुंबईला चॅम्पियन बनवलं. यानंतर आयपीएलमध्येही (IPL) त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली. पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तिकडे भारत-श्रीलंका यांच्यात तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये पृथ्वी शॉ आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) ओपनिंगला खेळतील हे जवळपास निश्चित आहे. 21 वर्षांच्या पृथ्वी शॉने आतापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. 5 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने त्याने 339 रन केले, यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर 3 वनडेमध्ये त्याने 84 रन केले, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 40 रन आहे. पृथ्वीने टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात केली, पण न्यूझीलंडमधल्या दोन टेस्ट आणि ऑस्ट्रेलियातली एक टेस्ट अशा मिळून 6 इनिंगमुळे शॉच्या करियरला ब्रेक लागला. या दरम्यान त्याला फक्त एक अर्धशतक करता आलं, तर अन्य 5 इनिंगमध्ये त्याला 20 रनचा आकडाही पार करता आला नाही. यानंतर ऑस्ट्रेलियात शुभमन गिलला संधी देण्यात आली. भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनीही बाहेरून खेळाडूला आणू नये, अशीच भूमिका मांडली. 'टीम बाहेरून खेळाडू आणण्याची गरज नाही. निवड समितीलाही थोडा मान दिला पाहिजे. त्यांनी टीमची निवड केली आहे आणि विराट-शास्त्रीसोबत चर्चा केल्याशिवाय टीमची निवड होऊ शकत नाही. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल हे दोन मोठे खेळाडू तुमच्यासोबत आहेत, तरीही तिसऱ्या ओपनरची तुम्हाला गरज आहे का? मला तरी वाटत नाही,' असं कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले. टीमसोबत सध्या ओपनर म्हणून मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), केएल राहुल (KL Rahul) यांच्याशिवाय स्टॅण्डबाय खेळाडू असलेला अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Iswaran) आहे. या तीन खेळाडूंना बाहेर ठेवून जर पृथ्वी शॉला टीममध्ये घेतलं, तर त्यांचं मनोबल खच्ची होण्याची शक्यता आहे. ओपनर म्हणून मयंक अग्रवालने 13 टेस्टच्या 21 इनिंगमध्ये 48 च्या सरासरीने 1005 रन केले आहेत. तर केएल राहुलने 33 टेस्टमध्ये 54 इनिंग खेळून 1915 रन केले. अभिमन्यू इश्वरनला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Kl rahul, Prithvi Shaw, Team india

    पुढील बातम्या