IND vs ENG : टीम इंडियाच्या 'बापू'मुळे विराटच्या फेवरेट खेळाडूची जागा धोक्यात!

IND vs ENG : टीम इंडियाच्या 'बापू'मुळे विराटच्या फेवरेट खेळाडूची जागा धोक्यात!

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) 112 रनवर ऑल आऊट झाला. भारताचे स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर.अश्विन (R.Ashwin) यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समनची दाणादाण उडाली.

  • Share this:

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) 112 रनवर ऑल आऊट झाला. भारताचे स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर.अश्विन (R.Ashwin) यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या बॅट्समनची दाणादाण उडाली. अक्षर पटेलने इंग्लंडच्या 6 तर अश्विनने 3 विकेट घेतल्या. आपली 100वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्मा (Ishant Sharma)ला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून ओपनर झॅक क्रॉले याने सर्वाधिक 53 रन केले.

अक्षर पटेलने लागोपाठ दुसऱ्या टेस्टमध्ये इनिंगमध्ये पाच विकेट घेतल्या. याआधी दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही अक्षरला पाच विकेट मिळाल्या होत्या, तर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या होत्या.

दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षरने 21 ओव्हरमध्ये 60 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. तर या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 21.4 ओव्हरमध्ये 38 रन देऊन 6 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्ध फिट झाला नाही, म्हणून अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्ध संधी देण्यात आली. पण पहिल्या टेस्टआधी अक्षर पटेलला दुखापत झाली, त्यामुळे त्याला खेळता आलं नाही. अखेर दुसऱ्या टेस्टमधून अक्षरने भारतीय टेस्ट टीममद्ये पदार्पण केलं.

अक्षर पटेलने त्याच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियाला रविंद्र जडेजाची उणीव अजिबात भासवून दिली नाही. त्यामुळे आता अक्षरमुळे जडेजाचं स्थान धोक्यात आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अक्षर पटेलचा उल्लेख टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये बापू असा केला जातो, तर रविंद्र जडेजा विराट कोहलीचा फेवरेट खेळाडू आहे, त्यामुळे टीम इंडियाच्या बापूमुळे विराटच्या फेवरेट खेळाडूची जागा धोक्यात आली आहे का? असा प्रश्न किकेट चाहते विचारत आहेत.

Published by: Shreyas
First published: February 24, 2021, 8:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या