IND vs ENG : भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये इंग्लंडचा हा क्रिकेटपटू ठरणार ट्रम्प कार्ड!

IND vs ENG : भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये इंग्लंडचा हा क्रिकेटपटू ठरणार ट्रम्प कार्ड!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंडचा माजी ऑफ स्पिनर ग्रॅम स्वान (Graeme Swan) च्या मते या दौऱ्यात इंग्लंडसाठी जॅक लिच आणि डॉम बेस ही स्पिनर्सची जोडी ट्रम्प कार्ड ठरेल.

  • Share this:

लंडन, 24 जानेवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यशस्वी कामगिरी करून आलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास बळवला आहे. तर श्रीलंका दौऱ्यावर असलेली इंग्लंडची टीमही शानदार फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत होईल. इंग्लंडचा माजी ऑफ स्पिनर ग्रॅम स्वान (Graeme Swan) च्या मते या दौऱ्यात इंग्लंडसाठी जॅक लिच आणि डॉम बेस ही स्पिनर्सची जोडी ट्रम्प कार्ड ठरेल. लिच आणि बेस यांनी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती, पण गॉल टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये दोघांनाही विकेट मिळाली नाही.

स्वानने आपल्या 255 टेस्ट विकेटपैकी 60 विकेट भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये घेतल्या आहेत. भारतामध्ये खेळपट्टी सपाट असेल, तरीही बॉल स्पिन होतो, असं स्वान म्हणाला. 'सध्या भारतीय टीममध्ये सेहवाग नाही, पण विराट जेव्हा स्पिन खेळतो, तेव्हा तो खराब बॉलची वाट पाहतो. भारतीय बॅट्समन धैर्यशील आहेत, पण तुम्हीही संयम ठेवून दिवसभर बॉलिंग केली, तर तुम्हाला विकेट मिळतील. तुम्हाला त्यांच्याविरुद्ध खूप मेहनत करावी लागेल, यात तुमची लयही बिघडू शकते,' असा धोका स्वानने बोलून दाखवला.

भारतामध्ये लिच मोलाची भूमिका बजावू शकतो, पण त्याने बॉल सरळ ठेवला पाहिजे. मिडल स्टम्पवर निशाणा ठेवून त्याने बॉलिंग केली पाहिजे, असा सल्ला स्वानने दिला. जर लिचने अशाप्रकारे बॉलिंग केली तर, इंग्लंड त्यांचे प्रमुख बॉलर मार्क वूड, जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बदलू शकतं, असं स्वानला वाटतं.

Published by: Shreyas
First published: January 24, 2021, 2:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या