Home /News /sport /

IND vs ENG : ...मग हार्दिक पांड्या टीममध्ये कशाला?

IND vs ENG : ...मग हार्दिक पांड्या टीममध्ये कशाला?

इंग्लंडविरुद्धची चौथी टी-20 टीम इंडियासाठी (India vs England) करो या मरो आहे. सीरिजमध्ये इंग्लंडची टीम 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम गंभीर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) बॅटिंग क्रमावर नाराज आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद, 18 मार्च : इंग्लंडविरुद्धची चौथी टी-20 टीम इंडियासाठी (India vs England) करो या मरो आहे. सीरिजमध्ये इंग्लंडची टीम 2-1 ने आघाडीवर आहे, जर चौथ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला, तर सीरिज गमावण्याची नामुष्की विराट कोहलीवर (Virat Kohli) येईल. या सीरिजमध्ये टीम इंडियाने घेतलेल्या काही निर्णयांवरही अनेकांनी आक्षेप घेतले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गौतम गंभीर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) बॅटिंग क्रमावर नाराज आहे. पांड्याला 7 व्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्याऐवजी भारताने एखाद्या बॉलरला संधी दिली पाहिजे, असं गंभीर म्हणाला. तो इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलत होता. 'मला समजत नाही, अक्षर पटेल बॅटिंग करू शकतो, वॉशिंग्टन सुंदर बॅटिंग करू शकतो, शार्दुल ठाकूरलाही बॅटिंग येते. इंग्लंड 6 बॅट्समनना घेऊन खेळत आहे. हार्दिक सातव्या क्रमांकावर दिसत आहे. पहिल्या टी-20 मध्ये भारतीय टीम योग्य होती. चांगल्या टीमविरुद्ध तुम्हाला 6 बॉलर घेऊन जावं लागेल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या टीम 160-170 रनचा पाठलाग सहज करू शकतात,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली. गौतम गंभीरने केएल राहुलच्या बॅटिंगबाबतही प्रश्न उपस्थित केले. केएल राहुलला बघून मी हैराण झालो. राहुल मोठा स्कोअर करतो किंवा अजिबात काही करत नाही, त्याला रोहित-विराटकडून शिकणं गरजेचं आहे. रोहित-विराट फॉर्ममध्ये नसले तरी ते योगदान देतात, पण केएल राहुल अजिबात असं करत नाही. त्याला रन करण्याचा मार्ग शोधावा लागेल, असं वक्तव्य गंभीरने केलं. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या 3 टी-20 मध्ये फक्त एकच रन केली, मागच्या दोन्ही मॅचमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Gautam gambhir, Hardik pandya, India vs england

    पुढील बातम्या