Home /News /sport /

IND vs ENG : हिटमॅन रोहितने पहिल्याच बॉलवर सिक्स मारून घडवला इतिहास

IND vs ENG : हिटमॅन रोहितने पहिल्याच बॉलवर सिक्स मारून घडवला इतिहास

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या चौथ्या टी-20 मॅचमध्ये भारताची सुरूवात धमाकेदार झाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) मॅचच्या पहिल्याच बॉलला सिक्स मारून टीमचं खातं उघडलं.

    अहमदाबाद, 18 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या चौथ्या टी-20 मॅचमध्ये भारताची सुरूवात धमाकेदार झाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) मॅचच्या पहिल्याच बॉलला सिक्स मारून टीमचं खातं उघडलं. इंग्लंडने पहिली ओव्हर राशिद खानला (Rashid Khan) सोपवली, यानंतर त्याने पहिलाच बॉल गुगली टाकला. रोहित शर्माला राशिदची ही रणनीती लगेच कळली आणि त्याने बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत रोहित शर्माने इतिहास घडवला. टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचच्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. या सुरुवातीनंतरही रोहितला मोठी मजल मारता आली नाही. जोफ्रा आर्चरने स्वत:च्या बॉलिंगवर रोहितचा कॅच पकडला. टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप चौथ्या टी-20 मध्ये भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप राहिली. केएल राहुल (KL Rahul) लागोपाठ चौथ्या मॅचमध्ये अपयशी ठरला. 17 बॉलमध्ये 14 रन करून राहुल आऊट झाला. बेन स्टोक्सने त्याला परत पाठवलं. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) खराब शॉट खेळला. लेग स्पिनर आदिल रशीदने विराटची विकेट घेतली. रशीदने 8 वेळा विराटची विकेट घेतली. 5 बॉलमध्ये त्याला 1 रनच करता आली. टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये विराट पहिल्यांदाच स्टम्पिंग आऊट झाला. पण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंग करणाऱ्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 28 बॉलमध्ये अर्धशतक केलं. या मॅचसाठी कर्णधार विराट कोहलीने टीममध्ये दोन बदल केले. इशान किशन (Ishan Kishan) आणि युझवेंद्र चहलऐवजी (Yuzvendra Chahal) राहुल चहर (Rahul Chahar) आणि सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. इशान किशनला दुखापत झाल्यामुळे तो खेळू शकला नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या