मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : सुंदर-बेयरस्टो मैदानातच भिडले, अंपायरने केला हस्तक्षेप, पाहा VIDEO

IND vs ENG : सुंदर-बेयरस्टो मैदानातच भिडले, अंपायरने केला हस्तक्षेप, पाहा VIDEO

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने मोठा पराभव झाला. या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात मैदानामध्येच बाचाबाची झाली.

अहमदाबाद, 13 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs England) 8 विकेटने मोठा पराभव झाला. या मॅचमध्ये सुरूवातीला बॅट्समननी निराशा केली. श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) अर्धशतक वगळता टीम इंडियाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टॉस हरल्यानंतर पहिले बॅटिंग करत भारताने 20 ओव्हरमध्ये 124 रनपर्यंत मजल मारली. यानंतर भारतीय बॉलरपुढे हे आव्हान रोखण्याचं आव्हान होतं, पण त्यांनाही मैदानात कमाल करता आली नाही.

या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्यात मैदानामध्येच बाचाबाची झाली. इंग्लंडची बॅटिंग सुरू असताना 14 व्या ओव्हरमध्ये सुंदरच्या बॉलिंगवर डेव्हिड मलानने सरळ शॉट मारला, त्यावेळी बेयरस्टो मध्ये आल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला सोपा कॅच पकडता आला नाही, त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर बेयरस्टोवर भडकला आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. अखेर अंपायरना या दोघांच्या वादात हस्तक्षेप करावा लागला.

तर दुसरीकडे युझवेंद्र चहल टी-20 आंतरराष्ट्रीयमधला टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर बनला आहे. चहलने जॉस बटलरला एलबीडब्ल्यू केलं, ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधली 60 वी विकेट ठरली. 46 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचमध्ये 8.34 रनच्या इकोनॉमी रेटने चहलने हा रेकॉर्ड केला आहे. याआधी बुमराह भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. बुमराहने 50 मॅचमध्ये 20.25 ची सरासरी आणि 6.66 च्या इकोनॉमी रेटने 59 विकेट घेतल्या होत्या.

याचसोबत चहलची ही 100वी आंतरराष्ट्रीय मॅच होती. 2016 साली हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मधून चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वनडेमध्ये त्याने 54 मॅचमध्ये 92 विकेट घेतल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: India vs england, T20 cricket